छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास दोन राष्ट्रांना जोडणार! 'या' देशात शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार; शौर्याचा जागतिक सन्मान

Chhatrapati Shivaji Maharaj Statue: इस्रायलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारला जाणार आहे. महाराजांचा वारसा आता इस्रायलमध्ये दिसून येणार आहे.
Chhatrapati Shivaji Maharaj Statue

Chhatrapati Shivaji Maharaj Statue

ESakal

Updated on

६ जून २०२६ रोजी भारतात १६७४ मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या स्मरणार्थ शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जात असताना एका अनपेक्षित ठिकाणाहून एक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली. इस्रायलचे मुंबईतील महावाणिज्यदूत यानव रेवाच यांनी जाहीर केले की, इस्रायल आपल्या प्रमुख शहरांपैकी एका शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याची योजना आखत आहे. भारत आणि इस्रायलच्या जनतेला अधिक जवळ आणण्यासाठी हा एक दीर्घकालीन उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com