संघर्ष पुन्हा पेटणार; इस्त्रायलकडून गाझावर हवाई हल्ला

Israel
Israel
Summary

इस्त्रायल हवाई दलाने (Israel Launches Air Raids) बुधवारी सकाळी गाझामध्ये हवाई हल्ला केला आहे. पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी जाळपोळ करणारा फुगा (Arson Balloons) दक्षिण इस्त्रायलमध्ये सोडला होता.

गाझा- इस्त्रायल हवाई दलाने (Israel Launches Air Raids) बुधवारी सकाळी गाझामध्ये हवाई हल्ला केला आहे. पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी जाळपोळ करणारा फुगा (Arson Balloons) दक्षिण इस्त्रायलमध्ये सोडला होता. त्यानंतर प्रत्युत्तर म्हणून हा हल्ला करण्यात आल्याची माहिती इस्त्रायल सुरक्षा दलाकडून देण्यात आली आहे. या हल्ल्यामुळे इस्त्रायल आणि पॅलेस्टिनमधील संघर्ष पुन्हा सुरु होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिलंय. (Israel Launches Air Raids In Gaza In Response To Arson Balloons)

इस्त्रायल आणि गाझामध्ये 21 मे रोजी शस्त्रसंधी झाली होती. 11 दिवस चाललेल्या या भीषण संघर्षात 260 पॅलेस्टिनींचा आणि 13 इस्त्रायली नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता जाळपोळ करणारा फुगा आणि हलाई हल्ला प्रकरण घडल्याने पुन्हा संघर्षाची शक्यता निर्माण झाली आहे. पॅलिस्टिनी सूत्रांच्या माहितीनुसार, इस्त्रायल सुरक्षा दलाने दक्षिण गाझातील खान युनूसमधील एका भागाला टार्गेट केले. AFP च्या एका फोटोजर्नलिस्टने हा हल्ला पाहिला.

Israel
Euro : जर्मनीचा स्वत:च्या पायावर घाव; फ्रान्सनं साधला डाव!

इस्त्रायल सुरक्षा दलाने सांगितलं की, ''जाळपोळ फुगा इस्त्रायलमध्ये सोडण्यात आला होता. याला प्रत्युत्तर म्हणून हमासच्या एका इमारतीवर रॉकेट हल्ला करण्यात आला. या इमारतीमध्ये हमासच्या दहशतवाद्यांची बैठक व्हायची.'' मेमध्ये सुरु झालेल्या संघर्षात जवळपास 1000 इमारती, कार्यालये, दुकानांचे नुकसान झाले होते. अनेकांना विस्थापित व्हावं लागलं होतं. इस्त्रायल जेरुसलमच्या एकत्रीकरणाचे उत्सव साजरा करत होता. त्यानंतर निर्माण झालेल्या तणावानंतर संघर्षाला सुरुवात झाली होती. इस्त्रायलने 1967 मध्ये जॉर्डच्या ताब्यात असणाऱ्या पूर्व जेरुसलमवर ताबा मिळवला होता.

Israel
तृणमूल काँग्रेसचे असाल तरच रोजगार मिळणार; सरपंचाने काढला आदेश

विशेष म्हणजे इस्त्रायलमध्ये नवीन सरकार सत्तेत आल्यानंतर हा पॅलेस्टिनसोबतचा पहिला संघर्ष आहे. बेंजामीन नेतन्याहू यांची 12 वर्षांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आली आहे. पंतप्रधान म्हणून नफ्ताली बेनेट सत्तेत आले आहेत. नफ्ताली हे कट्टर उजव्या विचारसरणीचे आहेत. ते नेतान्याहू यांचीच भूमिका पुढे रेटण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. असे असले तरी नफ्ताली यांचे सरकार अनेक पक्षांच्या युतीने तयार झाले आहे. यात अरबांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या एका पक्षाचाही समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com