

“Smoke and destruction in Dahieh, southern Beirut, following an Israeli airstrike reportedly killing Hezbollah’s top commander, Hatem Ali Tabtabai.”
esakal
Summary
इस्रायलने बेरूतच्या दहिये भागात मोठा एअर स्ट्राईक केला.
IDF ने हिज्बुल्लाहचे चीफ ऑफ स्टाफ हैथम अली तबतबाई ठार झाल्याचा दावा केला.
हिज्बुल्लाहने अद्याप या मृत्यूला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
Israel Lebanon war : लेबनॉनची राजधानी बेरूतच्या दक्षिणेकडील भागात असलेल्या दहिये येथे रविवारी (२३ नोव्हेंबर) इस्रायलने मोठा एअर स्ट्राईक केला. इस्रायल डिफेन्स फोर्सेस (IDF) ने दावा केला आहे की हिजबुल्लाहचे चीफ ऑफ स्टाफ हैथम अली तबतबाई या हल्ल्यात ठार झाले. तथापि, हिजबुल्लाहने अद्याप याची पुष्टी केलेली नाही. हा हल्ला इतका शक्तिशाली होता की स्फोटानंतर लोक इमारतींमधून बाहेर पडले, ज्यामुळे संपूर्ण परिसरात घबराट पसरली. अनेक इमारतींचे आणि वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.