Hossein Amirabdullah : ड्रोन हल्ल्यात इस्राईलचा सहभाग नाही; इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांचे स्पष्टीकरण; चौकशी सुरू

संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) सुरक्षा समितीच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी ते न्यूयॉर्कला गेले आहे.
Hossein Amirabdullah
Hossein Amirabdullahesakal

तेहरान ः ‘‘इराणवर काल रात्री झालेल्या हल्ल्याची चौकशी सुरू असून यात इस्राईलचा सहभाग असल्‍याचा पुरावा अद्याप मिळाला नसल्याचे सांगत इराणचे परराष्ट्र मंत्री हुसेन अमीराब्दुल्ला यांनी या हल्ल्याला फारसे महत्त्व दिले नाही.

Hossein Amirabdullah
Nashik News : लासलगाव येथे अनाथ गौरीचा विवाह थाटात; जय जनार्दन अनाथ व वृद्ध आश्रमातील 105 वी लेक

संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) सुरक्षा समितीच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी ते न्यूयॉर्कला गेले आहे. तेथे पत्रकारांशी बोलताना अमीराब्दुल्ला म्हणाले, ‘‘हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची इराणची कोणतीही योजना नाही. पण इस्राईलने मोठे पाऊल उचलले तर आम्हीही मागे हटणार नाही. जर इस्राईलने इराणवर हल्ला करण्याचे ठरविले आणि ते सिद्ध झाल्यास आम्हीही त्वरेने तोडीस तोड उत्तर देऊ. नंतर इस्राईलला याचा पश्‍चात्ताप होईल,’’ असा इशारा त्यांनी दिला.

Hossein Amirabdullah
Dhule News : ग्रामसेवकास माहिती आयोगाचा ‘दणका’; माहिती देण्यास टाळाटाळ भोवली

इराणमधील इस्फहान शहरावर शुक्रवारी (ता.१९) रात्री हल्ला झाल्याचा दावा येथील माध्यमे आणि काही अधिकाऱ्यांनी केला होता. त्यावर बोलताना अमीराब्दुल्ला म्हणाले की, इराणच्या अंतर्गत भागात काही ड्रोन उडाले होते. हवेत काही मीटर उंचीवर असतानाच ते ड्रोन निकामी करण्यात आले. यात इस्राईलचा हात आहे, याचा पुरावा मिळालेला नाही. त्याबाबत चौकशी सुरू आहे.

इस्राईलचे ड्रोन मुलांच्या खेळण्याप्रमाणे

इस्राईलने इराणवर केलेल्या हल्ल्यांची खिल्ली अमीराब्दुल्ला यांनी उडविली. ‘‘ज्याप्रकारे हा हल्ला झाला, तो हल्ला नव्हताच. ते ड्रोन आमच्या मुलांच्या खेळण्यांसारखे होते. असे वाटत होते की, आमची मुले खेळ खेळत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com