Israel Politics : इस्रायलमध्ये सत्तांतराचे संकेत, नेतन्याहू १९ वर्षांनंतर पायउतार होणार; प्रतिस्पर्ध्याला सरकार स्थापनेचे राष्ट्रपतींकडून निमंत्रण

Netanyahu Government : राष्ट्राध्यक्ष आयझॅक हर्झोग यांनी शनिवारी गादी आयझेनकोट यांना नवे सरकार स्थापन करण्याचे आमंत्रण दिले. २७ ऑक्टोबर २०२६ च्या निवडणुकीत कोणत्याही ब्लॉकला स्पष्ट बहुमत मिळाले नाही.
Israel Political Crisis: Netanyahu’s 19-Year Rule Under Threat

Israel Political Crisis: Netanyahu’s 19-Year Rule Under Threat

esakal

Updated on: 

इस्रायलच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. गेल्या १९ वर्षांपासून इस्रायलच्या राजकारणात प्रभाव असलेले पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची सत्ता जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शनिवारी इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष आयझॅक हर्झोग यांनी नेतन्याहू यांचे राजकीय प्रतिस्पर्धी आणि मध्यममार्गी आघाडीचे नेते गादी आयझेनकोट यांना सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले. त्यामुळे इस्रायलमध्ये नव्या सरकारच्या स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. मात्र, नव्या सरकारचा शपथविधी कधी होणार, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...