
हमास आणि इस्रायल यांच्यात सुरु असलेलं युद्ध थांबवण्यासाठी शस्त्रसंधीचा करार झाला. या कराराअंतर्गत हमासने इस्रायलच्या चार महिला सैनिकांची सुटका केली. महिला सैनिकांची सुटका करण्याआधी त्यांची परेड करण्यात आली. तर इस्रायलने या चार महिला सैनिकांच्या बदल्यात २०० पॅलेस्टाइन कैद्यांना सोडलं. यात १२० कैदी असेही आहेत ज्यांनी इस्रायलच्या लोकांवर घातक हल्ले केलेत आणि यात त्यांना दोषी ठरवल्यानंतर जन्मठेपेची शिक्षाही झालीय.