लॉकडाउनमध्ये दुकानदारांचे ५० हजार कोटींचे नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Grocery shopkeepers lockdown

लॉकडाउनमध्ये दुकानदारांचे ५० हजार कोटींचे नुकसान

मुंबई: राज्यातील गेल्या चाळीस दिवसांच्या लॉकडाऊनच्या काळात दुकानदारांचा पन्नास हजार कोटी रुपयांचा (50 thousand crore)व्यवसाय बुडाल्याचा (shopkeepers lost) व्यापारी संघटनांचा अंदाज आहे. राज्यातील साथीचा फैलाव आता हळुहळू कमी होत असल्याने दुकानेही टप्प्याटप्प्याने उघडावीत अशी मागणी करण्यात येत आहे. फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विरेन शहा यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात ही मागणी केली आहे. (shopkeepers lost 50 thousand crore in lockdown)

लॉकडाऊनपेक्षा प्रशासनाने वैद्यकीय साधनसामुग्री मिळविण्यावर भर दिला पाहिजे. गेल्या चाळीस दिवसांत त्यादृष्टीने आपल्याला यश मिळाले असल्याने आता व्यापारउदीमही सुरु करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. चार ते पंधरा एप्रिलपर्यंतच्या अंशतः लॉकडाऊनमध्ये राज्यभरातील व्यापाऱ्यांचे दहा हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले तर त्यानंतर रोज तेराशे कोटी रुपयांचे एकत्रित नुकसान होत आहे. आता निदान पंधरा मे नंतर ज्या ठिकाणी कोरोनाचा फैलाव कमी झाला आहे तेथे दुकाने उघडण्यास संमती द्यावी, असेही शहा यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा: एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांना दिलासा

सध्या राज्यातील बिगर अत्यावश्यक गोष्टींची विक्री करणारी दुकाने पूर्णपणे बंद आहेत. तर अत्यावश्यक सेवांची दुकाने सकाळी अकरा वाजेपर्यंतच खुली असतात. राज्यातील आरोग्य सेवकांनी तसेच शासकीय कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करून कोरोनाचा फैलाव आटोक्यात आणला आहे.

हेही वाचा: महाराष्ट्रात लॉकडाउन ३१ मे पर्यंत वाढवणार?

मुंबई मॉडेलची तर सर्वोच्च न्यायालयानेही प्रशंसा केली आहे. अशा स्थितीत मुंबईत नॉन कंटेनमेंट विभागात तरी दुकाने निर्बंधांसह खुली करावीत. अन्यथा सध्या दुकाने बंद असल्याचा फायदा इ कॉमर्स कंपन्यांना होतो आहे. हे विक्रेते बिनदिक्कतपणे अवैधरित्या घरपोच साहित्य पोहोचवीत आहेत. त्यांच्यावरदेखील कारवाई करावी, असेही व्यापारी दाखवून देत आहेत.

दुकानांची संख्या -

मुंबई - तीन ते चार लाख

महाराष्ट्र - 13 लाख

13 लाख दुकानांचे प्रत्येकी रोजचे 10 हजार रुपये नुकसान.

रोजचे एकूण नुकसान तेराशे कोटी रु.

लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढविल्यास होणारे जादा नुकसान - 19 हजार 500 कोटी.

संभाव्य एकूण नुकसान - 69 हजार 500 कोटी रु.

Web Title: Shopkeepers Lost 50 Thousand Crore In

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top