
इस्राईलने गाजा पट्टीवर केला हल्ला, सैन्याला केले सतर्क
इस्त्राईल आणि पॅलेस्टाईन दरम्यान पुन्हा एकदा हल्ले सुरु झाले आहेत. हरेत्झच्या वृत्तानुसार, इस्राईलच्या वायुसेनेने १८ एप्रिल रोजी दक्षिण गाझापट्टीतून क्षेपणास्त्र डागल्याने त्यास प्रत्युत्तर म्हणून हल्ले करण्यात आले आहे. इस्त्राईल (Israel) सेनेने सांगितले, की वायूसेनेच्या युद्ध विमानांनी हमासशी संलग्न एक शस्त्रास्त्रे निर्माण करणारी प्रयोगशाळा नष्ट केली आहे. १८ एप्रिल रोजी इस्राईलच्या आयरन डोम मिसाईल (Missile) सुरक्षा प्रणालीने चार महिन्यात एन्क्लेवसाठी पहिले राॅकेट लाँचिंगमध्ये गाझापट्टीतून एक क्षेपणास्त्राला रोखले होते. मात्र या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नव्हते. (Israel Strikes On Gaza, Be Alert Instruction To Military)
हेही वाचा: चीनच्या शांघाय शहरात कोरोनामुळे स्थिती चिंताजनक, कडक निर्बंध सुरुच
अल-अक्सा मशिदीतील घटनेमुळे वातावरण दुषित
वेस्ट बँक शहर जेनिनमध्ये इस्राईल सेना आणि सशस्त्र पॅलेस्टाईन आपापसात भिडले आणि हिंसक झडप झाली आहे. इस्राईलच्या हल्ल्यानंतर हमासचे प्रवक्ते हाजेम कासेम म्हणाले, की इस्राईलच्या नियंत्रणाविरोधात आमचा संघर्ष उचित आहे. हमासने जेरुसलम आणि अल-अक्सा मशिदीत इस्राईली सुरक्षा दलांच्या घुसखोरानंतर इस्रायलवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. मात्र राॅकेट हल्ल्यानंतर कोणत्याही दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
हेही वाचा: मोठ्या पुरामुळे आफ्रिकेत आपत्कालीन स्थिती, ४०० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू
इस्राईल सेना सतर्क
वेगवेगळ्या वृत्तांनुसार, इस्राईलची गुप्तचर संस्था मोसादसह इतर गुप्तचर संस्थांचे म्हणणे आहे, की भले या दिवसांमध्ये झडप वाढली आहे. मात्र याचा अर्थ असा नाही की तो आणखीन पसरेल. गुप्तसंस्थांनी सुरक्षेचा विचार करता सेनेला सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.
Web Title: Israel Strikes On Gaza Be Alert Instruction To Military
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..