पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा! कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लोक उतरले रस्त्यावर

Israelis, Benjamin Netanyahu,corona
Israelis, Benjamin Netanyahu,corona
Updated on

जेरुसलेम : जगभरात कोरोनाने कहर माजवला आहे. सध्या जगात अमेरिका, ब्राझील आणि भारतात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. हे मोठे देश सोडून इतर लहान देशातही कोरोना पसरत आहे, त्यामुळे तिथली परिस्थीतीही बिकट झाली आहे. इस्त्राईललाही (Israel) देखील कोरोनाच्या झटक्याला सामोरे जावे लागत आहे. सध्या इस्त्राईलमध्येही कोरोनाची साथ मोठ्या प्रमाणात पसरत आहे. वाढत्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळे इस्त्राईली लोकही त्रासलेले दिसत आहेत. यामुळेच शनिवारी रात्री इस्त्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू (Benjamin Netanyahu ) यांच्या अधिकृत निवासस्थानाबाहेर हजारो इस्रायलींनी निषेध नोंदवित राजीनामा देण्याचीही  मागणी केली. याठीकाणी हजारो इस्त्राईली नागरिक एकत्र आले होते. 

इस्रायलमध्ये कोरोनाचे रोज विक्रमी कोरोना रुग्ण वाढत असून याचा प्रसार रोखण्यात सरकार कमी पडत आहे, असा आरोप निदर्शकांनी केला. तसेच याकाळात देशात बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे आणि भ्रष्टाचाराच्या वाढत्या प्रमाणामुळे नेतान्याहू यांनी राजीनामा द्यायला हवा, अशीही मागणी इस्त्राईली नागरिकांनी केली. सध्या इस्त्राईलमध्ये 26 हजारांपेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत तसेच आतापर्यंत 1 हजारंपेक्षा जास्त लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी आता नेतान्याहू सरकार अजून एकदा देशात लॉकडाऊन जाहीर करण्याची शक्यता दिसत आहे. 

नेतान्याहू सरकारच्या विरोधात झालेल्या निदर्शनावेळी लोकांनी 'क्रांती' आणि 'येथून निघून जा' असे शब्द लिहलेलं फलक झळकवल्याचे पाहायला मिळाले. तसेच आंदोलकांनी निळे आणि पांढरे इस्त्रायली झेंडेही हातात धरले होते. नेतान्याहूंच्या निवासस्थानाबरोबरच देशभरातील पुलांवर आणि चौकां-चौकांमध्ये इस्त्राईली नागरिकांनी नेतान्याहू सरकार विरोधात निदर्शने केली. पोलिसांनी आतापर्यंत 13 जणांना अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, ही कारवाई करताना दोन पोलिस अधिकारी जखमी झाले आहेत. नेतान्याहू यांनी या निदर्शकांना 'डावे' आणि 'अराजकवादी' म्हणून नाकारले आहे. परंतु या इस्त्राईली नागरिकांच्या निदर्शनाने जगाचे लक्ष इस्त्राईलकडे गेले आहे. शुक्रवारी सर्बिया आणि कोसोवो यांनी इस्रायलमधील त्यांचे दूतावास जेरुसलेमला हलविण्याची घोषणा केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com