मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला CAA वर बोलले, म्हणाले...

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 जानेवारी 2020

सत्या नडेला हैदराबादचे
सत्या नडेला हे मुळचे भारतातील हैदराबादचे आहेत. स्मिथ यांच्याशी बोलताना त्यांनी भारतीय संस्कृतीविषयीही चर्चा केली. नडेला म्हणाले, की मी भारतीय संस्कृतीत वाढल्याने मला आनंद आहे. हैदराबाद हे शहर आपली कारकिर्द घडविण्यासाठी सर्वोत्तम आहे. आम्ही तेथे ईद, ख्रिसमस आणि दिवाळी असे तिन्ही सण मोठ्या उत्साहात साजरे करत होतो.

वॉशिंग्टन : भारतात नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून (सीएए) दररोज आंदोलने होत असताना आता मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनीही याविषयी मत व्यक्त केले आहे. भारतात या कायद्यावरून सुरु असलेल्या आंदोलनावरून त्यांनी खंत व्यक्त केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बझफीडचे प्रमुख बेन स्मिथ यांनी ट्विट करत याविषयी माहिती दिली आहे. स्मिथ यांनी म्हटले आहे, की सत्या नडेला यांना भारतात लागू करण्यात आलेल्या सीएए विषयी विचारले असता त्यांनी भारतात सुरु असलेले आंदोलन दुःखद असल्याचे म्हटले आहे. भारतात हे काही होत आहे ते चुकीचे आहे. जर एखादा बांगलादेश निर्वासित भारतात इन्फोसिससारख्या एखाद्या कंपनीचा सीईओचा झाल्यास मला आनंदच होईल. 

Breaking : 'वादग्रस्त पुस्तकाशी संबंध नाही'; भाजपचे 'हात वर', तर लेखकाचा माफीनामा 

नडेला यांनी मॅनहॅटन येथे झालेल्या मायक्रोसॉफ्टच्या कार्यक्रमात आपले मत मांडले आहे. अमेरिकेतील सर्वांत मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक असलेल्या मायक्रोसॉफ्ट कंपनीचे ते सीईओ आहेत. याबरोबरच भारतीय वंशाचे सुंदर पिचई हे सध्या गुगलचे नेतृत्व करत आहेत. 

सत्या नडेला हैदराबादचे
सत्या नडेला हे मुळचे भारतातील हैदराबादचे आहेत. स्मिथ यांच्याशी बोलताना त्यांनी भारतीय संस्कृतीविषयीही चर्चा केली. नडेला म्हणाले, की मी भारतीय संस्कृतीत वाढल्याने मला आनंद आहे. हैदराबाद हे शहर आपली कारकिर्द घडविण्यासाठी सर्वोत्तम आहे. आम्ही तेथे ईद, ख्रिसमस आणि दिवाळी असे तिन्ही सण मोठ्या उत्साहात साजरे करत होतो.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Its just bad Microsoft CEO Satya Nadella says about CAA