ब्रिटनने वाद मागे ठेवून पुढे जाण्याची वेळ - जेनरीक

यूएनआय
Thursday, 28 May 2020

पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांचे मुख्य राजकीय सल्लागार डॉमिनिक कमिंग्ज यांनी लॉकडाउनचे उल्लंघन केल्यामुळे निर्माण झालेला वाद मागे ठेवण्याची वेळ आली आली असून आता पुढे वाटचाल करावी, असे आवाहन गृहनिर्माण मंत्री रॉबर्ट जेनरीक यांनी केले.

लंडन - पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांचे मुख्य राजकीय सल्लागार डॉमिनिक कमिंग्ज यांनी लॉकडाउनचे उल्लंघन केल्यामुळे निर्माण झालेला वाद मागे ठेवण्याची वेळ आली आली असून आता पुढे वाटचाल करावी, असे आवाहन गृहनिर्माण मंत्री रॉबर्ट जेनरीक यांनी केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

कमिंग्ज यांनी लॉकडाउन असूनही अत्यवस्थ पत्नी व चार वर्षांच्या मुलासह लंडनहून डुरहॅमला आपल्या मोटारीतून प्रवास केला होता. यानंतरही जॉन्सन यांनी त्यांच्यावर कारवाई केली नाही. त्यामुळे वृत्तपत्रे तसेच सोशल मिडीयावरून या दोघांवर टीकेचा भडीमार झाला. त्यातच कमिंग्ज यांनी माफी मागण्यासही नकार दिला आहे.

सीमेवरील परिस्थिती नियंत्रणात; चीनचे स्पष्टीकरण

या पार्श्‍वभूमीवर जेनरीक यांनी सांगितले की, कमिंग्ज सोडून इतर विषयांवर सरकारने बोलावे अशी लोकांची इच्छा आहे. याचा अर्थ हा मुद्दा महत्त्वाचा नाही असे नाही, पण याहून जास्त लक्ष द्यावे असे विषाणू आणि अर्थव्यवस्थेसारखे विषय आपल्यासमोर आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Its time for Britain to move on

Tags
टॉपिकस
Topic Tags: