इव्हांका बनली ट्रम्प यांची विनावेतन सल्लागार

वृत्तसंस्था
गुरुवार, 30 मार्च 2017

परदेशी नेत्यांसोबत चर्चेत इव्हांका सहभागी

जानेवारीमध्ये जपानचे पंतप्रधान शिंझो अबे यांच्या स्वागतासाठीही ती ट्रम्प यांच्यासोबत उपस्थित होती. तसेच, जर्मनीच्या प्रमुख अँजेला मार्केल यांनी व्हाईट हाऊसला भेट दिली तेव्हा अँजेला आणि ट्रम्प यांच्यादरम्यान झालेल्या बैठकीतही ती सहभागी झाली होती. 

वॉशिंग्टन : अमेरिकेची 'फर्स्ट डॉटर' इव्हांका ट्रम्प हिला आणखी एक उपाधी मिळणार आहे. वडील व राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची सल्लागार म्हणून इव्हांका विनामूल्य काम करणार असल्याचे व्हाईट हाऊसने जाहीर केले आहे. 

इव्हांकाचे पती जेरेड कुशनर हे ट्रम्प यांचे वरिष्ठ सल्लागार म्हणूनही काम करत आहेत. अमेरिकन संघराज्याची अधिकारी म्हणून इव्हांका वेतन घेणार नाही. तसेच, रिअल इस्टेट व्यावसायिक असणारे कुशनर हेदेखील विनावेतन काम करत आहेत. कुशनर हे व्हाईट हाऊसच्या 'अमेरिकन इनोव्हेशन ऑफिस'चे संचालकही आहेत. खास त्यांच्यासाठी हे पद निर्माण करण्यात आले आहे. 

"इव्हांका ट्रम्प अध्यक्षांच्या मदतीसाठी फर्स्ट डॉटर म्हणून त्यांनी अभूतपूर्व पाऊल उचलले आहे याचा आम्हाला आनंद आहे," असे व्हाईट हाऊसने म्हटले आहे. 
'इव्हांकाच्या विनावेतन सेवेमुळे नैतिकता, पारदर्शकता आणि मान्यता याप्रती आमची वचनबद्धता दृढ झाली आहे. यामुळे अमेरिकन जनतेला धोरणांचे खरे लाभ मिळवून देण्यासाठी इव्हांका पुढाकार घेतील. यापूर्वी त्यांना हे शक्य झाले नसते,' असे त्यांनी सांगितले. 

डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून 35 वर्षीय इव्हांका व्हाईट हाऊसला नियमित हजेरी लावत आहे. जानेवारीमध्ये जपानचे पंतप्रधान शिंझो अबे यांच्या स्वागतासाठीही ती ट्रम्प यांच्यासोबत उपस्थित होती. तसेच, जर्मनीच्या प्रमुख अँजेला मार्केल यांनी व्हाईट हाऊसला भेट दिली तेव्हा अँजेला आणि ट्रम्प यांच्यादरम्यान झालेल्या बैठकीतही ती सहभागी झाली होती. 
 

Web Title: Ivanka officially joins Trump administration without pay at white house