इवांका ट्रम्पबरोबर कॉफी डेटला जायचे आहे का?

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्पच्यासोबत तुम्ही कॉफी डेटला जाण्यास उत्सुक असाल तर ही संधी तुमच्यासाठी नव्या वर्षात उपलब्ध होणार आहे. मात्र या डेटसाठी तुम्हाला सुमारे 34 लाख रुपये मोजावे लागतील. ही किंमत वाढत जाण्याची शक्‍यता आहे. इवांकाबरोबर कॉफी डेटला जाण्यासाठी पाच डिसेंबर सध्या ऑनलाइन रांगा लागत आहेत. या रांगेत उभे राहण्यासाठी तुम्ही केवळ 20 डिसेंबरपर्यंतच बोली लावू शकता.

या डेटच्या बोलीची किंमत सुरवातील साडे पाच लाख होती नंतर ही किंमत वाढत गेली. इवांका या डेटमधून मिळालेली रक्कम आपला भाऊ एरिक याच्या सेवाभावी संस्थेला मदत म्हणून देणार आहे. या अर्थिक मदतीसाठी तिने ही "कॉफी डेट' ठेवली आहे. जो सर्वाधिक बोली लावेल त्याच्याबरोबर इवांका डेटला जाणार आहे. या डेटला आतापर्यंत 34 लाखांची बोली लावण्यात आली आहे. ही डेट ट्रम्प कुटुंबाच्या एका आंतरराष्ट्रीय हॉटेलमध्ये होणार आहे. ही भेट 1 जानेवारी 2017 ते 1 जानेवारी 2018 या वर्षभरात कधीही होईल. लिलावातील विजेता तिच्यासोबत 35 ते 40 मिनिटे वेळ घालवू शकेल.

या डेटमधील विजेत्याची पूर्ण चौकशी करून तसेच त्याची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी नसल्याची खात्री केल्यानंतरच ही डेट निश्‍चित केली जाईल. ही चौकशी एका खासगी कंपनी
कडून केली जाणार असून त्या व्यक्तीला प्राथमिक शिष्टाचार, बोलण्यातील मृदुता, आदर, स्वत:ची चांगली ओळख करून देता येणे आवश्‍यक आहे. एकंदरीतच इवांकाबरोबर डेटला जाण्याची स्वप्ने पाहणाऱ्या जगभरातील तरुणांना बरेच अडथळे पार करत जावे लागणार असे दिसते.

इवांका मॉडेलिंग क्षेत्रात कार्यरत असली तरी ट्रम्प कुटुंबियांचा रिअल इस्टेट आणि हॉटेल व्यवसायदेखील ती संभाळते. अमेरिकन राष्ट्रध्यपदाच्या निवडणुकीच्या वेळी ट्रम्प यांनी केलेल्या आक्षेपार्ह ट्‌विटमुळे ती चर्चेत आली.

Web Title: Ivanka Trump Auctions $50K Coffee Chat to Benefit Brother Eric’s Foundation