लेकीला वाचवण्यासाठी ट्रम्प यांची धडपड; जाणून घ्या काय आहे 'मॅटर'

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 4 December 2020

याप्रकरणात इवांका ट्रम्प, अमेरिकेच्या प्रथम महिला मेलेनिया ट्रम्प, संबंधित समितीचे अध्यक्ष आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे अगदी जवळचे मानले जाणारे सहकारी थॉमस बराक ज्यूनिअर याना नोटीस बजावण्यात आली आहे. बराक यांना मागील महिन्यात चौकशीला सामोरे जावे लागले होते.

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पराभवाचा सामना करणाऱ्या ट्रम्प यांच्या अडचणी संपण्याचे नाव दिसत नाही. राजकीय दणका बसल्यानंतर ट्रम्प यांच्या कुटुंबियांतील व्यक्तींही अडचणी सापडल्याचे समोर येत आहेत. त्यांची मुलगी इवांका ट्रम्प या कथित घोटाळ्यामुळे चर्चेत आहेत.  2017 मध्ये ट्रम्प प्रशासनाच्या कमिटीने दानशूर व्यक्तींनी दिलेल्या निधीमध्ये घोटाळा केल्याचा आरोप केला जात आहे . याप्रकरणात नुकतेच इवांका ट्रम्प यांचीही चौकशी केली. 

सीएनएनच्या वृत्तानुसार, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी मुलगी आणि व्हाईट हाऊसमधील वरिष्ठ सल्लागार यांची वॉशिंग्टन डीसी स्थित अटॉनी जनरल कार्यालयात चौकशी झाली. अटॉर्नी जनरल ऑफिसने दानशूर व्यक्तींकडून जमा झालेल्या निधीमध्ये भ्रष्टाचार केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला आहे. समितीने 10 लाख डॉलरपेक्षा अधिक रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. 2017 मध्ये समितीने राष्ट्राध्यक्षांच्या हॉटेला चुकीच्या पद्धतीने पैसे दिले होते.  

Graduate Constituency Election Result 2020 जयंत पाटलांचं फडणवीसांना ओपन चॅलेंज

याप्रकरणात इवांका ट्रम्प, अमेरिकेच्या प्रथम महिला मेलेनिया ट्रम्प, संबंधित समितीचे अध्यक्ष आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे अगदी जवळचे मानले जाणारे सहकारी थॉमस बराक ज्यूनिअर याना नोटीस बजावण्यात आली आहे. बराक यांना मागील महिन्यात चौकशीला सामोरे जावे लागले होते.

कोलंबिया डिस्ट्रिक्ट अटॉर्नी जनरल कार्ल राकिने यांनी ओरोप केला होता की, ट्रम्प यांच्या इनॉग्रल समितीने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या हॉटेलमधील बॉलरूम बुक करण्यासाठी 10 लाख डॉलरपेक्षा अधिक रक्कम दिली होती. या व्यवहारात ट्रम्प कुटुंबियांना फायदा करुन देण्याचा उद्देश होता. निधीचा गैरवापर केल्याचा आरोपामुळे ट्रम्प कुटुंबियांची लेकही आता अडचणीत सापडली आहे. समितीने ट्रम्पच्या एका कार्यक्रमासाठी 107 मिलियन डॉलर इतकी रक्कम जमा केली होती.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ivanka Trump deposed as part of inauguration fund lawsuit