पुढील वर्षी जॅक मा 'अलिबाबा'तून निवृत्त 

Jack Mallya retires from 'Alibaba' next year
Jack Mallya retires from 'Alibaba' next year

बीजिंग (पीटीआय) : जगातील सर्वांत श्रीमंतांपैकी एक असलेले जॅक मा पुढील वर्षी "अलिबाबा' कंपनीच्या कार्यकारी अध्यक्षपदावरून निवृत्त होत आहेत. मा यांनी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॅनियल झॅंग यांची उत्तराधिकारी म्हणून निवड केली आहे. 
कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून मा वर्षभर कायम राहणार आहेत. मा यांनी त्यांच्या 54 व्या वाढदिवशी आपला उत्तराधिकारी जाहीर केला. 

झँग हे 46 वर्षांचे असून, ते 10 सप्टेंबर 2019 मध्ये कार्यकारी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. झॅंग यांच्याकडे पूर्ण सूत्रे सुपूर्द करेपर्यंत मा कार्यकारी अध्यक्षपदी राहतील. कार्यकारी अध्यक्षपदावरून निवृत्त झाल्यानंतर मा संचालक मंडळावर कायमस्वरूपी सदस्य म्हणून 2020 पर्यंत राहणार आहेत. सुरवातीच्या काळात इंग्रजीचे शिक्षक असलेले मा यांनी "अलिबाबा'ला 420 अब्ज डॉलरची कंपनी बनविले. व्यावसायिक जबाबदारीतून मुक्त होऊन मा आता सामाजिक कार्याकडे वळणार आहेत. ते प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रावर भर देणार आहेत. 

अलिबाबा ही कधीही जॅक मा याची नव्हती, परंतु मा सदैवी अलिबाबाचा राहील. 
- जॅक मा, कार्यकारी अध्यक्ष, अलिबाबा 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com