अणुबॉम्ब हल्ल्यातही बचावल्या होत्या 'त्या' दोन इमारती... काय आहे त्यामागचे रहस्य

वृत्तसंस्था
गुरुवार, 19 डिसेंबर 2019

अणुबॉम्बच्या हल्ल्यात हिरोशिमा शहरातील बराच भाग उद्ध्वस्त झाला होता. परंतू रीनफोर्स्ड काँक्रीटने तयार केलेल्या या इमारती हल्ल्यात बचावल्या.

हिरोशिमा : दुसऱ्या महायुद्धात (1945)  मध्ये जपानमधील हिरोशिमा या शहरावर अणुबॉम्बचा हल्ला करण्यात आला होता, या हल्ल्यात सर्वच जमिन जमिनदोस्त झाले होते. परंतू या हल्ल्यातून दोन इमारती मात्र बचावल्या होत्या. त्यांच्याबाबत जपान सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.  त्या दोन इमारतींना पाडण्याचे नियोजन जपान सरकार  करत आहे.

या इमारतींची निर्मिती 1913 मध्ये झाली होती. सर्वात अगोदर यांचा उपयोग एका कारखान्याच्या रुपात केला जात होता. या कारखान्यात लष्काराचे कपडे तयार केले जात असत. यानंतर येथे मुलांचे वसतीगृह बनवण्यात आले. त्यानंतर यांचा उपयोग तात्पुरते रुग्णालयाच्या रुपात करण्यात आला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अणुबॉम्बच्या हल्ल्यात हिरोशिमा शहरातील बराच भाग उद्ध्वस्त झाला होता. परंतू रीनफोर्स्ड काँक्रीटने तयार केलेल्या या इमारती हल्ल्यात बचावल्या. धातूच्या खिडक्या आणि दरवाजांना काही प्रमाणात हानी झाली होती. परंतू या इमारती बाचावल्या होत्या.

माझ्याविरोधात महाभियोग हा लोकशाही उद्‌ध्वस्त करण्याचा डाव : ट्रम्प 

2017 मध्ये अधिकाऱ्यांना तपासात आढळले की, भूकंपामुळे इमारतीचे बरेच नुकसान झाल्याने त्या कोसळण्याची शक्यता आहे. यामुळे संबंधित प्रशासन 2022 पर्यंत या इमारतींना पाडणार आहे. दरम्यान येथील एका तिसऱ्या इमारतीला संरक्षित केले जाणार आहे. या इमारतीच्या भिंती आणि छताची दुरुस्ती करण्यात येणार आहे.

ट्रम्प यांना मोठा झटका; महाभियोगाचा प्रस्ताव मंजूर

अमेरिकेने टाकले होते अणुबॉम्ब- दुसऱ्या महायुद्धात मे 1945 मध्ये जर्मनीने शरणागती पत्करल्यानंतरही जपानने आशियात युद्ध सुरु ठेवले होते. जपानने बिनशर्त आत्मसमर्पण करावे अशी अमेरिकेची इच्छा होती. मात्र जपानने शांतता प्रस्ताव नाकारल्यानंतर अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा शहरावर अणुबॉम्बचा हल्ला केला. हिरोशिमावर केलेल्या पहिल्या अणुबॉम्बच्या हल्ल्यात, तब्बल 1 लाख 40 हजार लोकांचा मृत्यू झाला होता. मात्र जपानने तातडीने शरणागती पत्करली नाही त्यामुळे अमेरिकेने तीन दिवसानंतर नागासाकीवर अणुबॉम्ब टाकला. अणुबॉम्ब हल्ल्याच्या 6 दिवसांनंतर जपानने आत्मसमर्पण केले, यासोबतच दुसरे महायुद्ध संपले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: japan atomic bomb building hiroshima demolished