esakal | जपानच्या पंतप्रधानपदी फुमिओ किशिदा; PM मोदींनी केले अभिनंदन
sakal

बोलून बातमी शोधा

जपानच्या पंतप्रधानपदी किशिदा; PM मोदींनी केले अभिनंदन

जपानच्या संसदेत सोमवारी फूमिओ किशिदा यांनी नवे पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली.

जपानच्या पंतप्रधानपदी किशिदा; PM मोदींनी केले अभिनंदन

sakal_logo
By
टीम ई सकाळ

जपानच्या संसदेत सोमवारी फूमिओ किशिदा यांनी नवे पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली. योशिहिदे सुगा यांनी राजीनामा दिल्यानंतर एलडीएफच्या नेतेपदी किशिदा यांची निवड गेल्या आठवड्यात झाली होती. यामध्ये किशिदा यांनी लसीकरण मंत्री तारो कोनो यांचा किशिदा यांनी पराभव केला होता. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फुमिओ किशिदा यांची जपानच्या पंतप्रधान पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केलं आहे. भारत आणि जपान यांच्यातील संबंध आणखी दृढ करण्याच्या दृष्टीने काम करण्यास मी उत्सुक आहे असंही मोदी म्हणाले.

किशिदा हे एक शांत आणि उदारमतवादी नेते म्हणून ओळखले जातात. मात्र पक्षात सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी त्यांनी आक्रमक भूमिकासुद्धा अनेकदा घेतली आहे. किशिदा यांना एलडीएफमधील दिग्गज नेत्यांनी पाठिंबा दिला. गेल्या आठवड्यात किशिदा यांनी त्यांचे प्राधान्य अर्थव्यवस्थेला असेल असं स्पष्ट केलं होतं. लोकांचे उत्पन्न वाढवणे आणि विकास, वितरणाची प्रणाली तयार करणं याला प्राधान्य देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

हेही वाचा: Nobel Prize: वैद्यकशास्त्रातील नोबेल जाहीर, 'हे' आहेत मानकरी

मावळते पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी एका वर्षाच्या आताच लिबरल डेमोक्रेटिक पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा दिला होता. पक्षाचा नेता म्हणून २९ सप्टेंबर २०२१ हा त्यांचा शेवटचा दिवस होता. त्यादिवशीच फुमिओ किशिदा यांची नवा नेता म्हणून निवड झाली. तसंच तेच जपानचे पंतप्रधान होतील यावरही शिक्कामोर्तब झालं होतं.

loading image
go to top