esakal | जपानच्या न्यूक्लिअर प्लांटमुळे जगाचं टेन्शन वाढलं

बोलून बातमी शोधा

japan nuclear plant

2011 मध्ये आलेल्या त्सुनामीमध्ये फुकुशिमा न्यूक्लिअर प्लांटला मोठा धक्का बसला होता. यातून रेडिएशन लीक होण्यास सुरवात झाली होती. तसंच हजारो लोकांना स्थलांतर करावं लागलं होतं. 

जपानच्या न्यूक्लिअर प्लांटमुळे जगाचं टेन्शन वाढलं
sakal_logo
By
टीम ई सकाळ

टोकियो - जपानने त्यांच्या फुकुशिमा न्यूक्लिअर प्लांटमधून एक मिलियन टनांहून जास्त प्रदुषित पाणी समुद्रात सोडण्याची तयारी सुरु केली आहे. या योजनेवर त्यांचे काम सुरु झाली आहे. जपान सरकारने सोमवारी याबाबतची माहिती दिली. जपानचे शेजारी देश आणि स्थानिक मच्छिमारांकडून याला विरोध होत असतानाच जपानने याची घोषणा केली आहे. घोषणा झाली असली तरी प्रत्यक्षात या कामाला सुरवात होण्यास आणखी काही वर्षे लागतील. तसंच काम पूर्ण होण्यास अनेक दशके लागू शकतात. मात्र जपानच्या या योजनेमुळे जगभरातून चिंता व्यक्त केली जात आहे.

जपानच्या सरकारने त्यांच्या योजनेचं समर्थन करताना पाणी समुद्रात सोडणं सुरक्षित असल्याचा दावा केला आहे. प्रदुषित पाण्यावर प्रक्रिया करून सर्व रेडिओअॅक्टिव घटक काढून टाकण्यात आले आहेत आणि पाणी डायल्यूट होईल असं त्यांचे म्हणणे आहे. या योजनेचं समर्थन इंटरनॅशनल अटॉमिक एनर्जी एजन्सीने केलं आहे. त्यांचे म्हणणेही असेच आहे की, जगात कुठंही न्यूक्लिअर प्लांटच्या प्रदुषित पाण्याची विल्हेवाट लावली जाते त्याचपद्धतीने ही योजना सुरु होईल. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी मंत्र्यांसोबतच्या बैठकीत सांगितलं की, पाण्याची विल्हेवाट लावण्याच्या या प्रक्रियेकडे दुर्लक्ष करता येणार नाही. न्यूक्लिअर प्लांट रिकामा करण्याची ही प्रक्रिया अनेक दशके चालणार आहे. पाणी सोडण्याची प्रक्रिया तेव्हाच  होईल जेव्हा पाण्याची सुरक्षा पातळी ठरवण्यात येईल. 

2011 मध्ये आलेल्या त्सुनामीमध्ये फुकुशिमा न्यूक्लिअर प्लांटला मोठा धक्का बसला होता. यातून रेडिएशन लीक होण्यास सुरवात झाली होती. तसंच हजारो लोकांना स्थलांतर करावं लागलं होतं. सध्या या प्लांटमध्ये 1.25 मिलियन टन पाणी साठलं आहे. या प्लांटला थंड ठेवण्यासाठी जमा केलेलं पाणी आणि पावसाच्या पाण्याचा यात समावेश आहे. एका पंपिंग आणि फ्लिट्रेशन सिस्टमिद्वारे याठिकाणी पाण्यातील रेडिओअॅक्टिव घटक काढले जातात.