esakal | Princess Mako : प्रेमासाठी राजगादी नाकारणारी राजकुमारी माको ऑक्टोबरमध्ये बांधणार लग्नगाठ!
sakal

बोलून बातमी शोधा

princess mako

प्रेमासाठी राजगादी नाकारणारी राजकुमारी माको ऑक्टोबरमध्ये बांधणार लग्नगाठ!

sakal_logo
By
टीम ई सकाळ

टोक्यो : जपानची राजकुमारी माको (Princess Mako) हीने प्रियकरासोबत लग्न करता यावं म्हणून कोट्यवधींची संपत्ती सोडली होती. त्यानंतर जपानमध्ये या लग्नाची एकच चर्चा रंगली आहे. आता ऑक्टोबर महिन्यात राजकुमारी माको ही तिचा प्रियकर कोमुरो केईसोबत (komuro kei) लग्नगाठ बांधणार आहे. प्रिन्स अकिशिनोच्या सर्वोच्च अधिकारी काची ताकाहारू यांनी पत्रकार परिषद घेऊन लग्नाची घोषणा केली आहे. याबाबत स्थानिक वृत्तसंस्थांनी माहिती दिली आहे.

हेही वाचा: आता ब्रिटनच्या नागरिकांनाही भारतात आल्यावर व्हावं लागणार क्वारंटाईन

राजकुमारी माको आणि तिच्या प्रियकराने येत्या २६ ऑक्टोबरला लग्नासाठी नोंदणी केली आहे. लग्नामध्ये राजघराण्याशी संबंधित कुठलेही रितीरिवाज केली जाणार नाहीत. लग्न झाल्यानंतर राजकुमारी माको तिच्या जोडीदारासोबत युएसला जाणार असून तिथे आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात करणार आहे, अशी माहिती जपानी माध्यमांनी दिली.

केई कोमुरोने 2013 मध्येच राजकुमारी माकोला लग्नाची मागणी घातली होती. मात्र, राजघराण्यातून विरोध झाल्याने त्यांचे लग्न टळले होते. त्याच्यासाठी राजकुमारीने सातवेळा लग्नाचा प्रस्ताव फेटाळला होता. जपानचे माजी सम्राट अकिहितो यांची नात राजकुमारी माको हिने 2017 मध्येच तिचा मित्र केई कोमुरो सोबत लग्न करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र केई कोमुरो आणि त्याच्या आईमध्ये आर्थिक वाद सुरू झाल्याने हे लग्न काही काळ टळलं होतं. मात्र, आता राजकुमारी माकोने प्रियकरासोबत लग्न करता यावं म्हणून कोट्यवधींची संपत्ती सोडली. शाही परीवार सोडल्यानंतर मिळणारी लाखो डॉलर्सची संपत्ती देखील तिने नाकारली आहे. शाही कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने जर सामान्य मुलाशी लग्न केलं तर तिचा शाही दर्जा काढून घेतला जातो. तो दर्जा काढून घेतल्यावर त्या मुलाला किंवा मुलीला दहा कोटी रूपये भरपाई म्हणून मिळतात. मात्र, ही भरपाई म्हणून मिळणारी रक्कम राजकुमारी माकोने नाकारली आहे. लग्नाचा प्रस्ताव ऐकून तिच्यावर आणि तिच्या प्रियकराच्या कुटुंबावर टीका झाली. त्यामुळे तिने ही रक्कम नाकारली असल्याचे जपानी मीडियाने सांगितले.

loading image
go to top