
Japan Tsunami Prediction: जपानमध्ये सध्या ५ जुलैची जोरदार चर्चा सुरू आहे. यामागे मंगा कलाकार रिओ तात्सकी यांची १९९९ साली 'द फ्युचर आय सॉ' (The Future I Saw) या पुस्तकात केलेली भविष्यवाणी आहे. या पुस्तकात त्यांनी दावा केला होता की, ५ जुलै रोजी जपानमध्ये एक विनाशकारी त्सुनामी येईल, जी २०११ च्या भयंकर तोहोकू आपत्तीपेक्षाही मोठी असू शकते.
रिओ तात्सकी यांना अनेकदा 'जपानी बाबा वेंगा' असे म्हटले जाते. त्यांनी यापूर्वी कोरोना व्हायरस, राजकुमारी डायनाचा मृत्यू आणि २०११ चा भूकंप-सुनामी यांची भविष्यवाणी केली होती. त्यांच्या भविष्यवाण्या मंगा स्वरूपात प्रकाशित होतात, पण अनेकदा त्या खऱ्या ठरल्या आहेत.