स्टार प्रवाह वाहिनीवरुन प्रेमाची गोष्ट मालिका आठ दिवसात प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेचं शेवटचं शुटिंग काही दिवसापूर्वी पार पडलं. यावेळी मालिकेतील कलाकार भावूक झाल्याचं पहायला मिळालं. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या. यावेळी अपूर्वी नेमळेकर सुद्धा भावूक झाल्याचं पहायला मिळालं. यावेळी तिने नाव न घेता तेजश्री प्रधानला टोला सुद्धा लगावलाय.