
जपानमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे
टोकिओ- जपानमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेने आपल्या आईच्या मृतदेहाला तब्बल 10 वर्षे फ्रिझरमध्ये ठेवले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आईच्या मृत्यूची बातमी बाहेर आली तर यामुळे घर तिच्याकडून हिसकावण्यात येईल, या भीतीपोटी महिलेने आपल्या आईचा मृतदेह अपार्टमेंटमधील फ्रिझरमध्ये ठेवला होता. पोलिसांनी न्यूज एजेंसी एएफजीला सांगितले की, 48 वर्षीय महिला युमी योशिनोला टोकिओमधून अटक करण्यात आली आहे.
युमी योशिनोने या भयंकर कृत्याबद्दल बोलताना म्हटलंय की, 10 वर्षांपूर्वी आईचा मृतदेह लपवला कारण त्यांना घर सोडायचं नव्हतं. ती आपल्या आईसोबत घरात रहात होती. एका दिवशी तिच्या आईचा मृत्यू झाला. यावेळी आईच्या मृत्यूची बातमी बाहेर आल्यास आपल्याला घराबाहेर काढण्यात येईल. या भीतीने महिलेने तब्बल दहा वर्षे आपल्या आईचा मृतदेह फ्रिझरमध्ये ठेवला.
संकटात पंतप्रधानांना आठवला 'राम'; शेजारील राष्ट्रात मंदिर उभारणीला...
क्योडो न्यूजनुसार, महिलेचा मृत्यू 60 वर्षे वय असताना झाला असावा. महिलेला सरकारी योजनेतून भाडेतत्वावर घर राहण्यासाठी देण्यात आले होते. आईच्या नावावर मिळालेले घर तिच्या मृत्यूमुळे युमी योशिनोला सोडावे लागले असते. त्यामुळे योशिनाने आपल्या आईचा मृत्यू झाल्याची बातमी बाहेर न येऊ देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तिने मृतदेह अपार्टमेंटमधील फ्रिझरमध्ये ठेवला.
घराचे भाडे न दिल्यामुळे महिलेला जानेवारी महिन्यात घर सोडण्यास भाग पाडण्यात आले होते. त्यानंतर एका व्यक्तीला घरातील फ्रिझरमध्ये मृतदेह असल्याचं आढळून आले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. युमी योशिनोला अटक करण्यात आली आहे. रिपोर्टनुसार महिलेच्या मृत्यूची निश्चित वेळ आणि कारण समजू शकलेलं नाही.