Coronavirus : कोरोनानंतर नवं संकट; त्सुनामीचा इशारा

वृत्तसंस्था
गुरुवार, 23 एप्रिल 2020

जपानमध्ये शक्तिशाली भूकंप झाल्यानंतर आता किनारी भागात त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. जपानमध्ये काल रात्री मोठा भूकंप झाला. रिश्टर स्केलवर याची तीव्रता 9 एवढी मोजली गेली. त्यानंतर त्सुनामीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

टोकियो : जपानमध्ये शक्तिशाली भूकंप झाल्यानंतर आता किनारी भागात त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. जपानमध्ये काल रात्री मोठा भूकंप झाला. रिश्टर स्केलवर याची तीव्रता 9 एवढी मोजली गेली. त्यानंतर त्सुनामीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काल झालेल्या या भूकंपामुळे 30 मीटर उंचीच्या लाटा उसळू शकतील, असं जपान सरकारच्या सरकारी अंदाजात वेधशाळेनं म्हटलं आहे. जपान सरकारच्या समितीने या भूकंपामुळे पॅसिफिक महासागरात महाकाय लाटा उसळू शकतात. जपानच्या उत्तर आणि ईशान्य भागात यामुळे धोका निर्माण झाला असल्याचे सांगितले आहे.

Coronavirus : बिल गेट्स यांच्याकडून मोदी सरकारचे कौतुक

फुकुशिमा अण्विक केंद्राला या त्सुनामीपासून धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त जपान सरकारच्या वेधशाळेकडून वर्तविण्यात आला आहे. हे न्यूक्लिअर स्टेशन त्सुनामीच्या टप्प्यात आहे का याविषयी आता चाचपणी सुरू झाली आहे. जपान सरकारने दिलेल्या ताज्या अंदाजाप्रमाणे 11 मीटर उंचीच्या म्हणजे साधारण 36 फूट भिंत बांधून लाटा अडवता येतील का याविषयी युद्धपातळीवर तयारी सुरू आहे.

Coronavirus : कोणतीही चूक करु नका; जागतिक आरोग्य संघटनेने दिला इशारा

दरम्यान मंगळवारी रात्री उशिरा जपानमध्ये शक्तिशाली भूकंप झाला आहे. रिश्टर स्केलवर याची तीव्रता 9 एवढी मोजली गेली. त्यानंतर त्सुनामीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे करोनंतर आणखी एक मोठं संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Japanese govt panel predicts earthquake of 9 magnitude tsunami of 30 m