दक्षिण आफ्रिकेच्या वादग्रस्त राष्ट्राध्यक्षांचा अखेर राजीनामा

वृत्तसंस्था
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

माझ्यासाठी कोणतीही जीवितहानी होऊ नये; आणि माझ्यासाठी पक्षामध्येही दुफळी माजु नये यासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे

प्रिटोरिया - दक्षिण आफ्रिकेचे वादग्रस्त राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांनी आज (गुरुवार) अखेर त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. आफ्रिकन नॅशनल कॉंग्रेस या झुमा यांच्या पक्षामधूनच त्यांनी पायउतार होण्यासाठी दबाव आणण्यात आला होता.

झुमा यांनी राजीनामा द्यावा वा संसदेत अविश्‍वासदर्शक ठरावासाठी सिद्ध रहावे, असा स्पष्ट इशारा त्यांना पक्षाकडून देण्यात आला होता. 2009 पासून सत्तेत असलेल्या झुमा यांच्याविरोधात अनेक भ्रष्टाचारासंदर्भातील अनेक गंभीर आरोप झाले आहेत.

""माझ्यासाठी कोणतीही जीवितहानी होऊ नये; आणि माझ्यासाठी पक्षामध्येही दुफळी माजु नये यासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे,'' अशी घोषणा झुमा यांनी यावेळी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jecom zuma south africa resign corruption