तांदळाचे दाणे मोजून त्याने सांगितली सर्वांत श्रीमंत व्यक्तीची संपत्ती

वृत्तसंस्था
सोमवार, 2 मार्च 2020

टिकटॉकवरील यांग नावाच्या युजरने चक्क जेफ बेजोस यांची संपत्ती मोजली आहे आणि तीही तांदूळाने! त्याने तांदूळांच्या एका दाण्याची किंमत एक लाख डॉलर इतकी सांगितली, अशा प्रकारे दहा लाख डॉलर्ससाठी दहा तांदळाचे दाणे बाजूला केले. अशा प्रकारे त्याने दहा हजार तांदळाचे दाणे मोजले.

नवी दिल्ली : टिकटॉकवर एक वेगळंच जग आपल्याला बघायला मिळतं. टिकटॉक युजर्स हे आपले फॉलोवर्स वाढविण्यासाठी सर्व तऱ्हेचे प्रयत्न करतात. अशाच प्रकारे टिकटॉकवरच्या एका युजरने एक हटके शक्कल लढवली आहे आणि एक व्हिडिओ शेअर केलाय. हा व्हिडिओ सोशल मीडियात भन्नाट व्हायरल होतोय. या व्हिडिओत अॅमेझॉनचे मालक व सर्वात श्रीमंत व्यक्ती जेफ बेजोसची संपत्ती उघड करण्यात आली आहे, तीही एका वेगळ्याच प्रकारे...

अयोध्येतील मंदिर २०२४ पूर्वी पूर्ण होईल!

टिकटॉकवरील यांग नावाच्या युजरने चक्क जेफ बेजोस यांची संपत्ती मोजली आहे आणि तीही तांदूळाने! त्याने तांदूळांच्या एका दाण्याची किंमत एक लाख डॉलर इतकी सांगितली, अशा प्रकारे दहा लाख डॉलर्ससाठी दहा तांदळाचे दाणे बाजूला केले. अशा प्रकारे त्याने दहा हजार तांदळाचे दाणे मोजले.

@humphreytalks

Rice. Part 2: Jeff Bezos net worth. ##rice ##billion ##billions ##amazon ##jeffbezos ##money ##personalfinance ##xyzcba

original sound - humphreytalks

यानंतर त्याने दुसरा एक व्हिडिओ केला, यात बेजोस यांची संपत्ती तांदळाच्या वजनावरून मोजली. यासाठी यांगला तब्बल २७ किलो तांदूळ लागले. ज्यावेळी यांगने हे मोजमाप केले त्यावेळी जेफ यांची संपत्ती तब्बल १२२ अब्ज डॉलर इतकी होती. यांगने जेफ यांनी नुकत्याच खरेदी केलेल्या घराची किंमतही तांदूळाद्वारे दाखवली आहे. या व्हिडिओची सोशल मीडियात चर्चा होत असून, यांगच्या हुशारीचेही कौतुक होत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  

जेफ बेजोस हे जगातील श्रीमंत व्यक्ती असून सध्या त्यांची संपत्ती १४० अब्ज डॉलर इतकी आहे. ते अॅमेझॉन या कंपनीचे मालक असून जगातील सध्या सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jeff Bezos Property count by Rice on Tiktok