गांजा फुकणाऱ्यांना नोकरीची संधी, वर्षाला ८८ लाख रुपयांचे पॅकेज! लोकांच्या लागल्या रांगा...

ganja
ganja

एका कंपनीला 'प्रोफेशनल स्मोकर्स'ची गरज आहे. या अजब नोकरीसाठी चांगला पगारही दिला जात आहे. नोकरीच्या जाहिरातीनुसार, प्रोफेशनल स्मोकर्सला गांजा फुकायचा आहे आणि त्याची गुणवत्ता तपासायची आहे. त्या बदल्यात ८८ लाख रुपये वार्षिक पॅकेज देण्यात येणार आहे. 'द सन'ने याबाबत वृत्त दिले आहे.  (Job opportunity for ganja smokers)

'द सन'ने दिलेल्या वृत्तानुसार, Cannamedical कंपनीची ही जाहिरात आहे. ही कंपनी जर्मनची आहे. या कंपनीने कॅनॅबिस सोमेलियर (Cannabis Sommelier) या पदासाठी जाहिरात काढली आहे. कंपनीला अशा कर्माचाऱ्याची गरज आहे जो प्रोफेशनल गांजा फुकणारा असेल. तसेच त्याला गांजाची गुणवत्ता तपासता येईल. 

Cannamedical ही एक फार्मा कंपनी आहे. ही कंपनी गांजाची औषध म्हणून विक्री करते. उत्पादनाची गुणवत्ता तपासण्यासाठी त्यांना प्रोफेशनल गांजा स्मोकरची गरज आहे. यासाठी ८८ लाख रुपये (वार्षिक) वेतन देऊ करण्यात आले आहे. 

ganja
Viral Video: काँग्रेस नेत्याच्या मुलाच्या लग्नात पाहुण्यांकडून गोळीबार करत जल्लोष; व्हिडिओ व्हायरल

याबाबत कंपनीचे सीईओ डेव्हिड हेन म्हणाले, आम्ही अशा व्यक्तीच्या शोधात आहोत जो ऑस्ट्रेलिया, कॅनडा, पोर्तुगाल, मॅसेडोनिया आणि डेन्मार्क या सोर्सिंग देशांमध्ये आमच्या उत्पादकांची गुणवत्ता तपासू शकेल. तसेच त्याला जर्मनीमध्ये डिलिव्हरी केलेल्या उत्पादनाची गुणवत्ता देखील तपासावी लागेल. गेल्या वर्षी जर्मनीत गांजा फुकायला कायदेशीर परवानगी मिळाली आहे. 

ही आहे अट - 

या नोकरीसाठी अर्ज करणारी व्यक्ती कॅनॅबिस पेशंट (cannabis patient) असावी. तसेच, त्याच्याकडे जर्मनीमध्ये कायदेशीररित्या गांजा ओढण्याचा परवाना देखील असणे आवश्यक आहे. या नोकरीसाठी लोकांच्या रांगा लागल्या आहेत. 

ganja
Viral Video : 'प्लिज मला नको खाऊस'.. ' हॉटेलात ताटातल्या माशानं चक्क चमचाच पकडला!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com