esakal | जो बायडन- कमला हॅरिस यांनी दिल्या दिवाळीच्या सदिच्छा
sakal

बोलून बातमी शोधा

biden harris

अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस तसेच अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल शनिवारी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

जो बायडन- कमला हॅरिस यांनी दिल्या दिवाळीच्या सदिच्छा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

वॉशिंग्टन : अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस तसेच अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल शनिवारी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. बायडेन यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, लाखो हिंदू, जैन, शिख आणि बौद्ध लोक प्रकाशपर्व साजरा करत आहेत.

हेही वाचा - पाकिस्तानमध्ये हिंदूंकडून उत्साहात दिवाळी साजरी, दिव्यांनी सजली मंदिरं

मी आणि माझी पत्नी जिल बायडेन दिवाळीच्या शुभेच्छा देतो. आपले नवे वर्ष आकांक्षा, आनंद आणि समृद्धीने भरलेले असो. नव्या वर्षाच्या शुभेच्छा. ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये दिवा लावतानाचा आपला एक फोटो शेअर केला. त्यांनी लिहलं की दिवाळीच्या शुभेच्छा. यासोबतच अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनीही दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. 

हॅरिस यांनी ट्विट करुन म्हटलं की, दिवाळी आणि नववर्षाच्या सदिच्छा. डगलस एमहॉफ (त्यांचे पती) आणि मी जगभरातील लोकांना सुरक्षित, आरोग्यदायी आनंदी अशा नव्या वर्षाच्या सदिच्छा देतो. याआधी परराष्ट्र मंत्री माइक पोम्पिओ यांनीदेखील लोकांना दिवाळीच्या सदिच्छा दिल्या आहेत. युरोप आणि पश्चिम आशियातील सात देशांच्या दौऱ्यावर असणाऱ्या पोम्पिओ यांनी म्हटलं की, अंधकारावर प्रकाशाचा विजय म्हणून साजऱ्या केल्या जाणाऱ्या दिवाळीच्या सर्वांना सदिच्छा.

जो बायडेन आणि कमला हॅरिस यांनी एकत्रितपणे प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात अमेरिका, भारत आणि जगातील इतर भागात प्रकाशाचे पर्व साजरे करणाऱ्या लोकांना सदिच्छा दिल्या आहेत. त्यांनी म्हटलंय की, अंधकारावर प्रकाशाचा, अज्ञानावर ज्ञानाचा आणि उदासिनतेवर सहानुभूतीचा हा सण दिवाळी यंदा गहन अर्थांसह आला आहे. 

हेही वाचा - डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनात अमेरिकेत हजारो लोक रस्त्यावर, आंदोलन सुरु
आपल्या प्रियजनांना गमावून बसलेल्या सर्वांप्रती आमच्या संवेदना आहेत. कोरोना प्रादुर्भावाशी लढण्यासाठी आमच्या सदिच्छा सर्वांसोबत  आहेत. यावर्षी दिवाळी व्हिडीओ कॉल आणि एकमेकांपासून अंतर  राखून साजरी केली गेलीय. आम्ही आशा करतो की पुढच्या वर्षी व्हाईट हाऊसमध्ये आपल्या सर्वांसोबत दिवाळी साजरी करता येईल.