esakal | डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनात अमेरिकेत हजारो लोक रस्त्यावर, आंदोलन सुरु
sakal

बोलून बातमी शोधा

donald trump 2 main.jpg

दरम्यान, मावळते अध्यक्ष ट्रम्प यांनी ‘आपण अध्यक्ष राहू की नाही हे काळच ठरवेल,’ असे सांगून स्वतःचा स्वर सौम्य केला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनात अमेरिकेत हजारो लोक रस्त्यावर, आंदोलन सुरु

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वॉशिंग्टन- अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचा निकाल समोर आला असून डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन हे निवडून आले आहेत. विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला आहे. पण डोनाल्ड ट्रम्प यांना हे मान्य नाही. इतकेच काय आता त्यांचे समर्थकही या निकालाविरोधात मैदानात उतरले आहेत. राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या निकालाला विरोध करण्यासाठी वॉशिंग्टन डीसीमध्ये हजारो समर्थकांनी ट्रम्प यांच्यासाठी आंदोलन केले. 

आता ट्रम्प यांच्यावर जानेवारीत नव्या प्रशासनाकडून कार्यभार सांभाळण्यापूर्वी सत्तेचे सहज हस्तांतरण करण्यासाठी दबाव वाढत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी नूतन राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या टीमला सहकार्य करण्याचा दबाव आहे. जनरल सर्व्हिसेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशनवर (जीएसए) बायडन यांना निर्वाचित राष्ट्राध्यक्षच्या रुपाने औपचारिक मान्यता देण्याची जबाबदारी आहे. त्यानंतरच हस्तांतरणाची प्रक्रिया सुरु होईल. एजन्सीच्या प्रशासक एमिली मर्फी यांनी अद्याप ही प्रक्रिया सुरु झाली नसल्याचे म्हटले आहे. एमिली यांची नियुक्ती ट्रम्प यांनी केली होती. 

हेही वाचा- अभिमानास्पद! जगभरातील टॉप वैज्ञानिकांच्या यादीत 36 भारतीय

गेल्या सोमवारी ट्रम्प यांनी माध्यमांनी केलेल्या एक्झिट पोलवर टीका केली होती. फॉक्स न्यूज, क्विनिपियाक पोल, एबीसी / वाशिंग्टन पोस्ट, एनबीसी / वॉल स्ट्रीट जर्नल यांचे पोल्स इतके चुकीचे होते की, याचा निवडणुकीवर प्रभाव पडल्याचा आरोप त्यांनी केला. 

हेही वाचा- गुगल बंद करु शकतं तुमचं जी मेल अकाऊंट ?

दरम्यान, मावळते अध्यक्ष ट्रम्प यांनी ‘आपण अध्यक्ष राहू की नाही हे काळच ठरवेल,’ असे सांगून स्वतःचा स्वर सौम्य केला आहे. जो बायडन यांच्याकडून पराभव मान्य न करण्याची भूमिका त्यांनी मवाळ केली असल्याचे सूचित झाले आहे. 
 

loading image