जो बायडन- कमला हॅरिस 'टाइम पर्सन ऑफ द इअर'ने सन्मानित

time person of the year
time person of the year

वॉशिंग्टन : अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांना टाइम मॅगझीनने सन्मानित केलं आहे. टाइमने त्यांना 2020 चा पर्सन ऑफ द इअर म्हणून निवडलं आहे. याबाबतची घोषणा मॅगझीनने गुरुवारी केली. बायडन आणि हॅरिस यांनी यावर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत बाजी मारली आहे. बायडन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना या निवडणुकीत हरवलं होतं. तर कमला हॅरिस या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष पदी बसलेल्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला ठरल्या आहेत. याआधी 2016 मध्ये टाइम मॅगझीनने डोनाल्ड ट्रम्प यांची निवड टाइम पर्सन ऑफ द इअर साठी केली होती. 

मॅगझीनच्या कव्हरमध्ये 78 वर्षीय बायडन आणि 56 वर्षीय हॅरिस यांचा फोटो प्रकाशित झाला आहे. याचं शिर्षक दिलंय - अमेरिकेची कहानी बदलत आहे. बायडन यांनी नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये ट्रम्प यांचा दणदणीत पराभव केला होता. बायडन यांना 306 इलेक्टोरल व्होट्स तर ट्रम्प यांना 232 इलेक्टोरल व्होट्स प्राप्त झाले होते. टाइम मॅगझीन 1927 पासून दरवर्षी अशा एखाद्या व्यक्तीला अथवा लोकांना सन्मानित करतं जे मोठ्या प्रमाणावर प्रभाव टाकतात. याआधी गुरुवारी टाइमने बास्केटबॉल सुपरस्टार लेब्रोन जेम्सला एथलिट ऑफ द इअर म्हणून निवडलं होतं.   

अमेरिकेची कहानी बदलण्यासाठी, विभाजनवादी शक्तीपेक्षा सहानुभूतीची शक्ती मोठी असल्याचं दाखवण्याकरता, दु:खी जगामध्ये बरे करण्याचा दृष्टीकोण दाखवल्याबद्दल आम्ही त्यांची निवड करतो आहोत, असं टाइमने म्हटलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com