Joe Biden on Covid-19 : 'कोरोनामुळे १०० लोकांचा बळी गेला', बायडेन यांची जीभ घसरली; व्हाईट हाऊसची सारवासारव

याआधीही बायडेन यांनी चुकून भारताऐवजी चीनला आपला मित्र म्हटलं होतं..
Joe Biden on Covid
Joe Biden on CovideSakal

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे. यापूर्वी देखील बऱ्याच वेळा स्लिप-ऑफ-टंगमुळे ते चर्चेचा विषय झाले आहेत. यातच आता आणखी एक भर पडली आहे.

मंगळवारी अमेरिकेतील एका कार्यक्रमात बोलत असताना बायडेन यांनी कोरोनाचा उल्लेख केला. कोविड-१९ मुळे '१०० पेक्षा अधिक' लोकांचा बळी गेला असं ते म्हणाले. व्हाईट हाऊसने त्यानंतर त्यांच्या भाषणाची अधिकृत प्रत जारी केली, ज्यामध्ये ही संख्या '१०० दशलक्षांहून अधिक' अशी करण्यात आली.

सध्या बायडेन यांचा हा व्हिडिओ व्हायरल होतो आहे. यापूर्वी जून महिन्यात देखील अशाच प्रकारामुळे ते चर्चेचा विषय ठरले होते. युक्रेन-रशिया युद्धाबद्दल बोलत असताना त्यांनी युक्रेनऐवजी चक्क इराक या युद्धात हरत आहे असं म्हटलं होतं. (Joe Biden Slip of Tongue)

या घटनेच्या एक दिवस आधी बायडेन यांनी भारताच्या जागी चीनचं नाव घेतलं होतं. "तुम्ही कदाचित माझ्या नव्या सर्वात खास मित्राला पाहिलं असेल. एका छोट्याशा देशाचे पंतप्रधान, जो आता जगात सर्वात मोठा देश आहे. हा देश म्हणजे चीन." असं ते म्हणाले होते. मात्र, लगेच त्यांनी आपली चूक सुधारत, आपण भारताबद्दल बोलत असल्याचं स्पष्ट केलं होतं.

Joe Biden on Covid
Joe Biden: अमेरिकेकडून रासायनिक शस्त्रांचा शेवटचा साठा नष्ट, बायडेन यांची घोषणा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com