esakal | 'अमेरिका, चीनची स्पर्धा व्हावी पण...' बायडेन-जिनपिंग फोनवर चर्चा
sakal

बोलून बातमी शोधा

'अमेरिका, चीनची स्पर्धा व्हावी पण...' बायडेन-जिनपिंग फोनवर चर्चा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यात सात महिन्यानंतर फोनवरून पहिल्यांदाच चर्चा झाल्याची माहिती व्हाइट हाउसने दिली आहे.

'अमेरिका, चीनची स्पर्धा व्हावी पण...' बायडेन-जिनपिंग फोनवर चर्चा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आणि चिनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यात फोनवरून संवाद झाला. यात काय चर्चा झाली याची माहिती व्हाइट हाउसकडून देण्यात आली आहे. राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून सात महिन्यांत पहिल्यांदाच बायडेन आणि जिनिपंग यांच्यात फोनवरून बोलणं झालं. गुरुवारी दोघांमध्ये फोनवरून चर्चा झाली. यामध्ये दोन्ही देशांमध्ये स्पर्धा व्हावी पण संघर्ष नको यावर दोन्हींचे एकमत झाल्याचं सांगण्यात आलं आहे.

अमेरिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पत्रकारांशी बोलताना ज्यो बायडेन आणि शी जिनपिंग यांच्यात झालेल्या चर्चेची माहिती दिली. फोनवर बायडेन यांनी सांगितले की, अमेरिकेची इच्छा आहे की, आपण दोन्ही देश हे स्पर्धक म्हणून कायम राहू पण अशी कोणती परिस्थिती निर्माण व्हायला नको की दोन्ही देश एकमेकांसमोर संघर्षासाठी उभा राहतील.

बायडेन आणि जिनिपिंग यांच्यात फेब्रुवारीमध्ये बोलणं झालं होतं. त्यानंतर बायडेन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर चीन आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे फोनवरून पहिलाच संवाद आहे. ट्रम्प यांच्या नेतृत्वात अमेरिका आणि चीनमधले संबंध ताणले गेले होते. बायडेन यांच्या प्रशासनाने ट्रम्प यांच्या अमेरिका फर्स्ट धोरणाला केराची टोपली दाखवत अनेक बदल घेतले. तरीही इतर मुद्द्यांवरून अमेरिकेचे चीनसोबत खटके उडत आहेत.

हेही वाचा: 'अफगाणिस्तानची स्थिती गंभीर; शेजारी, मित्र म्हणून भारताला चिंता'

व्हाइट हाउसने म्हटलं की, दोन्ही देशांमधील राजनैतिक अडथळा हा धोक्याचा आहे. दोन्ही नेत्यांनी या मुद्द्यावर हस्तक्षेपावर भर दिला. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांचेही असेच म्हणणे आहे की, देशांमधील स्पर्धेचं स्वागतच आहे पण याचं रुपांतर संघर्षात होऊ नये इतकीच अपेक्षा आहे. भविष्यात सुरक्षित वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने ही चर्चा केली असल्याचंही अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

loading image
go to top