esakal | 'अफगाणिस्तानची स्थिती गंभीर; शेजारी आणि मित्र म्हणून भारताला चिंता'
sakal

बोलून बातमी शोधा

'अफगाणिस्तानची स्थिती गंभीर; शेजारी, मित्र म्हणून भारताला चिंता'

संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टीएस तिरुमूर्ती यांनी सांगितलं की, अफगाणिस्तानमधील परिस्थिती गंभीर आहे.

'अफगाणिस्तानची स्थिती गंभीर; शेजारी, मित्र म्हणून भारताला चिंता'

sakal_logo
By
टीम ई सकाळ

संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत अफगाणिस्तानवरून चर्चा सुरु आहे. यामध्ये भारताने सांगितलं की, शेजारी देशाची स्थिती गंभीर झाली आहे आणि तात्काळ मदत करायला हवी. तसंच अफगाणिस्तानमधील महिलांचा आवाज ऐकण्याची गरज असल्याचा पुनरुच्चार भारताने केला. तालिबानने नुकतीच अफगाणिस्तानात हंगामी सरकारची घोषणा केली. त्याआधी सरकारमध्ये महिलांनासुद्धा संधी दिली जाईल असं तालिबानने म्हटलं होतं मात्र हंगामी सरकारची घोषणा केली आहे त्यात असे काहीच दिसत नाही.

संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टीएस तिरुमूर्ती यांनी सांगितलं की, अफगाणिस्तानमधील परिस्थिती गंभीर आहे. त्यांचे शेजारी आणि मित्र असल्याच्या नात्याने सध्याची परिस्थिती आमच्यासाठी चिंतेची आहे. अफगाणिस्तानमध्ये असलेल्या अल्पसंख्यांकांच्या सुरक्षेबाबतही मत व्यक्त केले. यात संयुक्त राष्ट्राने लक्ष घालण्याची आवश्यकता असल्याचं तिरुमूर्ती यांनी म्हटलं. गेल्या दोन दशकामध्ये जे काही अफगाणिस्तानमध्ये निर्माण झालं ते वाचवणं आणि तिथल्या नागरिकांच्या भविष्याबाबत सध्या तरी अस्थिरता आहे असेही तिरुमूर्ती यांनी म्हटलं.

हेही वाचा: काबूल: ‘एनआरएफ’ची व्यूहात्मक माघार

तिरूमूर्ती म्हणाले की, अफगाणिस्तानमधील महिलांचे म्हणणे ऐकण्याची आवश्यकता आहे. तिथल्या मुलांच्या इच्छा पूर्ण करणं आणि अल्पसंख्यांकांच्या संरक्षणाकडे लक्ष द्यावं लागणार आहे. अफगाणिस्तानमध्ये सर्व वर्गांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या सर्वसमावेशक व्यवस्थेसाठी भारताने आवाहन केले आहे. सर्वसमावेशक व्यवस्था निर्माण झाल्यास त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरून मान्यता मिळेल असेही तिरुमूर्ती यांनी सांगितले.

loading image
go to top