Joe Biden : ज्यो बायडेन यांच्या पुत्राला होऊ शकते १७ वर्षांची शिक्षा; 'या' प्रकरणांमुळे अडचणींमध्ये वाढ

अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांचे पुत्र हंटर बायडेन यांच्या अडचणीत भर पडत चालली आहे.
Hunter Biden
Hunter Bidenesakal

वॉशिंग्टनः अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांचे पुत्र हंटर बायडेन यांच्या अडचणीत भर पडत चालली आहे. कॅलिफोर्नियात करचुकवेगिरीच्या नऊ आरोपावर त्यांच्यावर गुरुवारी (ता.७) रात्री उशिरा अभियोग दाखल करण्यात आला.

या प्रकरणात हंटर दोषी आढळल्यास त्यांना १७ वर्षे तुरुंगावासाची शिक्षा होऊ शकते, असे विशेष वकील डेव्हिड विस यांनी सांगितले. डेलावरमध्ये २०१८ मध्ये बेकायदा बंदूक खरेदीच्या आरोपांव्यतिरिक्त हंटर यांच्यावर गुंडगिरीचे तीन आणि सहा दुष्कर्माचे आरोप ठेवले आहेत.

Hunter Biden
BBC New Chairman : मराठवाड्याचा सुपूत्र बीबीसीचा अध्यक्ष! कोण आहेत डॉ. समीर शहा? महाराष्ट्रातील या गावाशी आहे थेट कनेक्शन

अमेरिकेत अमली पदार्थांचे सेवन करणारी व्यक्ती बंदूक किंवा अन्य कोणतेही शस्त्र बाळगू शकत नाही. पण आरोपांनुसार अमली पदार्थांच्या अमलाखाली असलेल्या हंटर बायडेन यांच्या बंदूक सापडली. अमेरिकी कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

Hunter Biden
Research on Human : तुमच्या शरीरातल्या ११ अवयवांचे वय रक्तचाचणीने मोजता येणार

विशेष वकील डेव्हिड विस यांनी एका निवेदनात म्हटले आहे, की हंटर बायडेन यांनी कर भरण्याऐवजी विलासी जीवनशैलीवर लाखो डॉलर खर्च केले आहेत. हंटर यांनी २०१६ ते २०१९ या काळात सुमारे १४ लाख डॉलरची करचुकवेगिरी केल्याचा आरोप आहे. या काळात व्यसनाच्या आहारी ते गेले होते, हा आरोप त्यांनी कबूल केलेला आहे. हंटर यांची विशेष चौकशी सुरू राहील. बचाव पक्षाचे विस हे रिपब्लिकन पक्षाच्या पुढे झुकले असल्याचा आरोप वकील एब्बे लोवेल यांनी केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com