'जॉन्सन अँड जॉन्सन'ची लस शेवटच्या टप्प्यात; एकाच डोसमध्ये प्रभावी ठरणार असा दावा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 September 2020

ज्या व्हॉलेंटीअरवर या लशीची चाचणी घेण्यात येत आहे त्यांच्या तपासणीत सकारात्मक असे परिणाम समोर आले आहेत. कंपनीचं असं म्हणणं आहे की, या लशीच्या एकाच डोसने अपेक्षित परिणाम दिसून येईल. 

वॉशिंग्टन : जगभरात कोरोना महामारीमुळे वाढत्या रुग्णसंख्येच्या परिस्थितीत अमेरिकेच्या जॉनसन अॅण्ड जॉनसन कंपनीने लोकांना हायसं वाटेल अशी एक बातमी दिली आहे. कंपनीचा असा दावा आहे की, त्यांची कोरोनावरील लस आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. ज्या व्हॉलेंटीअरवर या लशीची चाचणी घेण्यात येत आहे त्यांच्या तपासणीत सकारात्मक असे परिणाम समोर आले आहेत. कंपनीचं असं म्हणणं आहे की, या लशीच्या एकाच डोसने अपेक्षित परिणाम दिसून येईल. 

जॉनसन अॅण्ड जॉनसनच्या वतीने कोरोना लशीबाबत केलेल्या या घोषणेनंतर व्हाईट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दरम्यान राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी आनंद व्यक्त म्हटलं की, अमेरिकेचा प्रत्येक चौथा नागरिक या कंपनीच्या अंतिम टप्प्यात असणाऱ्या चाचणीत व्हॉलेंटीअर आहे. त्यांनी अमेरिकन नागरिकांना असंही आवाहन केलं आहे की, कोरोना लशीच्या चाचणीसाठी व्हॉलेंटीअर म्हणून स्वत: पुढे यावं. 

हेही वाचा - राफेल जेट उडवणारी पहिली महिला पायलट बनतेय शिवांगी

यासोबतच डोनाल्ड ट्रम्प यांनी असंही म्हटलं की, आम्ही अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात जलद अशा आर्थिक सुधारणांना पुढे नेलं आहे. आमचा दृष्टीकोन विज्ञानवादी आहे. याप्रसंगी त्यांनी आपले प्रतिस्पर्धी जो बायडेन यांच्यावरही हल्ला करत म्हटलं की, त्यांचा दृष्टीकोन काय आहे, याबाबत मला कल्पना नाही. 

60 हजार लोकांवर होईल चाचणी

कोरोना लस बनवणारी जॉनसन आणि जॉनसन कंपनी ही आपल्या लशीच्या चाचणीत शेवटच्या टप्प्यात आहे. कंपनीने म्हटलं आहे की, बुधवारी सुरु होणाऱ्या या टप्प्यामध्ये हे तपासलं जाईल की, एकाच डोसमध्ये कोरोनाला रोखण्यासाठी ही लस प्रभावी आहे की नाही. आजवर कोरोना लशीसंदर्भात झालेल्या सर्वप्रकारच्या अभ्यासाच्या तुलनेत हा अभ्यास मोठा असेल. या लशीचे अमेरिका, दक्षिण अफ्रिका, अर्जेंटीना, ब्राझील, चीली, कोलंबिया, मॅक्सिको आणि पेरु या देशांमधील 60 हजार लोकांवर या लशीचे परिक्षण केलं जाईल. 

हेही वाचा - राफेलचा व्यवहार करारानुसार झाला नाही; कॅगच्या अहवालाने मोदी सरकार अडचणीत

या वर्षाअखेरपर्यंत लस येण्याची आशा

अमेरिकेच्या मॉडर्ना इंक आणि फाइजर इंक द्वारा बनवलेल्या लशीसमवेत काही अन्य देशांच्या लशीचे परिक्षण अंतिम टप्प्यात आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत एक सक्षम अशी लस येण्याची आशा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Johnsan & Johnson company claims corona will be effective in one dose