esakal | खुशखबर :जॉनसन लस देतीय 'कोरोना'विरोधात सकारात्मक परिणाम
sakal

बोलून बातमी शोधा

Johnsan & Johnsan

याआधी जूलै महिन्यात या लशीची माकडांवर चाचणी करण्यात आली होती, ज्यामध्ये लशीचे सकारात्मक परिणाम दिसून आले होते. 

खुशखबर :जॉनसन लस देतीय 'कोरोना'विरोधात सकारात्मक परिणाम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोरोनावरील लस केंव्हा येतेय याची सर्वजणच वाट पाहत आहेत. जगातील अनेक देशात अनेक आघाड्यांवर लस बनवण्यासाठीचे प्रयत्न सुरु आहेत. यातील काही लशी या सध्या दुसऱ्या अथवा तिसऱ्या टप्प्यातदेखील पोचल्या आहेत. काही लशींना अपेक्षित निष्कर्ष मिळत असून लसनिर्मितीच्या कामाला  गती येत आहे. अमेरिकीतील जॉनसन अँड जॉनसन कंपनीची लस यापैकीच एक आघाडीवरील लस आहे. 

जॉनसन अँड जॉनसन लशीच्या चाचणीमध्ये सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याची माहिती कंपनीने शुक्रवारी दिली आहे. या लशीमुळे कोरोनाविरोधात लढण्यासाठी लागणारी प्रतिकार शक्ती चांगलीच वाढत असल्याचे निष्कर्ष समोर आले आहेत.

हेही वाचा - Happy Birthday - भारताच्या अर्थव्यवस्थेला संकटातून बाहेर काढणारे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह 

कोरोना विषाणूच्या हाय रिस्कमध्ये असलेले वयस्कर लोक आणि तरुण लोक या दोघांचेही संरक्षण करण्यास ही लस एकसारखीच सक्षम आहे की नाही, ही गोष्ट मात्र अजून स्पष्ट व्हायची आहे. मात्र ही लस सुरक्षित असून त्याचे कसलेही साइड इफेक्ट नसल्याची बाब स्पष्ट झाली आहे. 

अमेरिकेच्या सरकारने या लशीला पाठींबा दिला आहे. सध्या जवळपास एक हजार लोकांवर याची चाचणी घेण्यात आली आहे. याआधी जूलै महिन्यात या लशीची माकडांवर चाचणी करण्यात आली होती, ज्यामध्ये लशीचे सकारात्मक परिणाम दिसून आले होते. 

हेही वाचा - भारदस्त आवाजाचे गारुड

जॉनसन अँड जॉनसन लशीचे दोन्ही डोस दिल्यानंतरही व्हॉलेंटीअरमध्ये कोणताही नकारात्मक परिणाम दिसून आलेला नाहीये. संशोधकांच्या म्हणण्यानुसार लशीच्या चाचणीत सहभागी व्हॉलेंटीअरमधील 98 टक्के लोकांच्या शरिरात अँटीबॉडीज निर्माण झाल्या आहेत. चाचणीच्या सुरवातीलाच इतके प्रभावी आणि अपेक्षित निष्कर्ष आल्यामुळे कंपनीने 60 हजार लोकांवरील अंतिम टप्प्यातील चाचणी सुरु केली आहे. 

सध्याच्या निष्कर्षावरुन तरी कंपनीने बुधवारी 60 हजार लोकांवर चाचणी सुरु केली आहे. या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचे निष्कर्ष या वर्षाच्या अखेरिस अथवा पुढील वर्षाच्या सुरवातीला येतील. 

loading image
go to top