
Jordan Muslim Brotherhood Ban : जॉर्डनने जगातील सर्वात मोठी सुन्नी इस्लामिक संघटना मुस्लिम ब्रदरहूडवर बंदी घातली आहे. कारण तिच्याशी संबंधित लोक शस्त्रे गोळा करतात आणि लोकांमध्ये धर्मांधता पसरवतात, जे देशासाठी धोका आहे. त्यामुळे अशा संघटनेवर बंदी घालणे हे राष्ट्रीय सुरक्षेसाठी योग्य राहील असे सांगत जॉर्डनच्या गृहमंत्रालयाने मुस्लिम ब्रदरहूडवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.