ॲरिझोनाला कमला हॅरीस यांची साद

वृत्तसंस्था
Saturday, 10 October 2020

अध्यक्षीय निवडणुकीतील मतदानावर आपले जीवन अवलंबून असल्याच्या भावनेतून ॲरिझोनाच्या रहिवाशांनी मतदान करावे, कारण खरोखरच तशी स्थिती आहे, असे उद्गार डेमोक्रॅटिक पक्षाच्या उपाध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरीस यांनी काढले.

वॉशिंग्टन - अध्यक्षीय निवडणुकीतील मतदानावर आपले जीवन अवलंबून असल्याच्या भावनेतून ॲरिझोनाच्या रहिवाशांनी मतदान करावे, कारण खरोखरच तशी स्थिती आहे, असे उद्गार डेमोक्रॅटिक पक्षाच्या उपाध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरीस यांनी काढले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ज्यो बायडेन यांच्या साथीत गुरुवारी त्यांनी एकत्र प्रचार केला. ऑगस्टमधील उमेदवारी जाहीर होण्याच्या परिषदेनंतर हे दोघे प्रचारासाठी प्रथमच एकत्र आले होते. त्यासाठी त्यांनी ॲरिझोना या अत्यंत महत्त्वाच्या प्रांताची निवड केली. येथे सिनेटरची जागा डेमोक्रॅटीक उमेदवार मार्क केली लढविणार आहेत. सध्या रिपब्लीकन पक्षाच्या मार्था मॅक््सॅली यांच्याकडे ही जागा आहे. या प्रांतावर डेमोक्रॅटिक पक्ष पुन्हा ताबा मिळविणार का याची उत्सुकता आहे.

कमला यांनी बुधवारी उपाध्यक्ष माईक पेन्स यांच्याविरुद्धच्या वादविवादात कोरोनाच्या हाताळणीवरून डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला बोल केला होता. यावेळीही त्यांनी हा मुद्दा आक्रमकपणे मांडला.

अर्मेनिया - अझरबैजानचे युद्ध रोखण्यासाठी रशियाचा पुढाकार

टपालाद्वारे मतदानाची प्रक्रिया सुरू
अध्यक्षपदाची निवडणूक जवळ आली असून मतदानाच्या प्रक्रियेला वेग आला आहे. ॲरिझोनामध्ये टपालाद्वारे मतदान करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी विनंतीसाठी २३ ऑक्टोबर, तर मतदानासाठी ३० पर्यंत मुदत आहे. या प्रांतामधील वाढलेली लोकसंख्या तसेच उपनगरी मतदारांमध्ये अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पाठिंब्यात होत असलेली घट हे मुद्दे आपल्या पथ्यावर पडतील असे डेमोक्रॅटिक पक्षाला वाटते.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kamala Harris call to Arizona citizens politics