कमला हॅरिस झाल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष; 1 तास 25 मिनिटांसाठी मिळाली जबाबदारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kamala Harris
कमला हॅरिस दीड तास झाल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष

कमला हॅरिस दीड तासांसाठी झाल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष

अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरीस यांनी शुक्रवारी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाचा पदभार स्विकारला होता. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या अनुपस्थितीत कमला हॅरीस (Kamala Harris) यांनी पहिल्यांदाच राष्ट्रपती पदाचा पदभार स्विकारला होता. त्यांनी काल सकाळी जवळपास दीड तासांसाठी राष्ट्राध्यक्ष पदावर काम केलं. शुक्रवारी घडलेली ही घटना ऐतिहासीक असून, अध्यक्ष जो बायडेन हे कोलोनोस्कोपी प्रक्रियेसाठी गेले असताना, उपराष्ट्राध्यक्ष कमला देवी हॅरिस यांनी काही काळ देशाचं नेतृत्व केलं.

हेही वाचा: सावधान...'या' देशात पुन्हा लॉकडाऊन!

व्हाईट हाऊसने शुक्रवारी सांगितले की, उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्याकडे एकूण एक तास 25 मिनिटे अध्यक्षीय अधिकार होते. जो बायडेन काही काळ अनुपस्थित असल्याने त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली होती. व्हाईट हाऊसच्या प्रेस ऑफिसने सांगितले की, सत्तेच्या तात्पुरत्या हस्तांतरणाची घोषणा करणारी अधिकृत पत्रे सकाळी 10:10 वाजता (1510 GMT) पाठवली गेली. तर राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी सकाळी 11:35 वाजता आपली कर्तव्ये पुन्हा सुरू केली.

हेही वाचा: चीनने केली हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची चाचणी; अमेरिकेकडेही नाही रोखण्याची क्षमता

घटनात्मकदृष्ट्या आदेशानुसार, राष्ट्रपती अनुपस्थित असताना व्हाईट हाऊसची कर्तव्ये उपराष्ट्राध्यक्षाने स्वीकारणं ही गोष्ट नवी नसली तरी, इतिहासात प्रथमच एका महिला उपराष्ट्रपतीने देशाच्या राष्ट्राध्यक्ष पदाचा पदभार सांभाळला आहे.

loading image
go to top