बायडेन यांचा फोन अन् आईची आठवण

पीटीआय
Wednesday, 16 September 2020

ज्यो बायडेन यांनी उपाध्यक्षपदाच्या उमेदवारीच्या प्रस्तावाबाबत झूम कॉल आला तेव्हा माझ्या डोळ्यासमोर अचानक आई आली. ती मला पाहत आहे आणि ती काय विचार करत असेल, असे मला वाटले, असे हॅरिस म्हणाल्या.

माजी उपाध्यक्ष ज्यो बायडेन यांनी जेव्हा उमेदवारीबाबत फोन कॉल केला तेव्हा आईची आठवण झाली, असे प्रतिपादन कॅलिफोर्नियाच्या सिनेटर आणि उपाध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांनी केले. यापूर्वीही कमला हॅरिस यांनी अनेक मुलाखतींत आपण आईपासून खूप प्रभावित आहोत, असे सांगितले आहे.  

कमला हॅरिस यांच्या आई श्‍यामला गोपालन या १९५७ रोजी पदवी पूर्ण केल्यानंतर उच्च शिक्षणसाठी भारतातून अमेरिकेत आल्या. कमला हॅरिस यांनी अनेक मुलाखतीत आईचा उल्लेख केला आहे. त्यांची आई कर्करोगतज्ञ होत्या. ज्यो बायडेन यांनी उपाध्यक्षपदाच्या उमेदवारीच्या प्रस्तावाबाबत झूम कॉल आला तेव्हा माझ्या डोळ्यासमोर अचानक आई आली. ती मला पाहत आहे आणि ती काय विचार करत असेल, असे मला वाटले, असे हॅरिस म्हणाल्या. अमेरिकेत येत्या तीन नोव्हेंबर रोजी अध्यक्षपदासाठी मतदान होणार असून डेमोक्रॅटिकचे उमेदवार ज्यो बायडेन हे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी लढत देत आहेत. तसेच उपाध्यक्षपदासाठी डेमोक्रॅटिकच्या कमला हॅरिस या रिपब्लिकनचे उमेदवार आणि उपाध्यक्ष माइक पेन्स यांचा सामना करत आहेत. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

हॅरिस म्हणाल्या, की त्या दिवशी ज्यो बायडेन यांच्याशी झूमवर एका खोलीतून बोलत होते. तेव्हा माझे पती डाऊग इमहॉफ यांचे कान माझ्या खोलीकडे लागले होते. आतमध्ये काय कुजबूज सुरू आहे, हे त्यांना ऐकायचे होते. थोड्याच वेळाने जिल बायडेन आणि इमहॉफ हे देखील झूम कॉलमध्ये सहभागी झाले. सत्तेत आल्यानंतर पहिले शंभर दिवसाची योजना काय असेल, असे विचारले असता त्या म्हणाल्या, संसर्गावर नियंत्रण ठेवणे हाच आमचा अजेंडा असेल. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kamala Harris said interviews that she is very impressed with her mother