कराचीत हॉटेलला लागलेल्या आगीत 11 जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था
सोमवार, 5 डिसेंबर 2016

कराची (पाकिस्तान)- हॉटेल रिजेंट प्लाझामध्ये आज (सोमवार) सकाळी लागलेल्या आगीत 11 जणांचा मृत्यू झाला असून, 65 जण जखमी झाले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरामध्ये असलेल्या फोर स्टार हॉटेल रिजेंट प्लाझामधील तळमजल्यावर असलेल्या किचनला आज सकाळी आग लागली. मोठ्या प्रमाणात बाहेर पडलेला धूर व जाळामुळे 11 जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत 65 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

हॉटेलला आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी अग्निशामक दलाचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. या पथकाने आग आटोक्यात आणली. धुर व जाळामुळे 11 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांमध्ये सहा पुरुष व पाच महिलांचा समावेश आहे. यामध्ये तीन डॉक्टर व हॉटेल व्यवस्थपाकाचा समावेश आहे, असेही पोलिसांनी सांगितले.

Web Title: karachi: 11 killed in fire at Regent Plaza hotel