Devotees celebrating Ganeshotsav 2025 in Karachi with Ganpati Bappa chants and cultural programs : भारतासह जगभरात गणोशोत्सव साजरा केला जातोय. याला पाकिस्तानही अपवाद नाहीये. पाकिस्तानच्या कराची शहरात गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होतो आहे. कराची शहर 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष बघायला मिळतो आहे. त्याचा व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. अनेकांनी यावर प्रतिक्रियासुद्धा दिली आहे.