पाककडून 43 भारतीय मच्छीमारांना अटक

वृत्तसंस्था
शुक्रवार, 15 डिसेंबर 2017

कराची: अरबी समुद्रात पाकिस्तानच्या सागरी हद्दीत बेकायदा मासेमारी केल्याचा आरोप ठेवत 43 भारतीय मच्छीमारांना पाकिस्तानकडून अटक करण्यात आली असल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी आज स्पष्ट केले. या मच्छीमारांच्या सात बोटीही ताब्यात घेण्यात आल्या आहेत.

ही घटना गुरुवारी घडली असून, अटक केलेल्या सर्व मच्छीमारांना पाकिस्तानच्या सागरी सुरक्षा विभागाने (पीएमएसएफ) पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. "पीएमएसएफ'चे अधिकारी कमांडर वाजीद नवाझ चौधरी यांनी सांगितले, की अटक करण्यात आलेल्या भारतीय मच्छीमारांना लवकरच न्यायालयासमोर हजर करण्यात येईल. मागील महिनाभरात पाकिस्तानच्या हद्दीत मासेमारी करणाऱ्या 144 भारतीय मच्छीमारांना अटक करण्यात आली आहे. तसेच, चालू वर्षी एकूण चारशे भारतीय मच्छीमारांना पाकिस्तानकडून अटक करण्यात आली आहे.

दुसऱ्या देशांच्या सागरी हद्दीत बेकादा मासेमारी केल्याबद्दल भारतीय आणि पाकिस्तानी मच्छीमारांना वारंवार अटक केली जाते. दोन्ही देशांचे गरीब मच्छीमार अनावधानाने दुसऱ्या देशाच्या हद्दीत मासेमारी करतेवेळी प्रवेश करतात, असे सांगण्यात आले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: karachi news 43 Indian fishermen arrested by Pakistan