अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राबाबत किम-जॉंग-उन समाधानी

पीटीआय
गुरुवार, 6 जुलै 2017

सोल - मोठे आणि वजनदार अण्वस्त्र वाहून नेण्याची उत्तर कोरियाच्या आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची (आयसीबीएम) क्षमता असल्याचा दावा, उत्तर कोरियाच्या वृत्तसंस्थेने आज केला. तसेच, उत्तर कोरियाचे नवे क्षेपणास्त्र अमेरिकेतील अलास्का पर्यंत पोचू शकते, असा दावा अमेरिकेतील तज्ज्ञांनी केला आहे.

उत्तर कोरियाने मंगळवारी चाचणी घेतलेले आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र मोठ्या क्षमतेचे अण्वस्त्र वाहून नेऊ शकते. ही उत्तर कोरियासाठी अभिमानाची बाब आहे. या क्षेपणास्त्राद्वारे अमेरिकेच्या भूमीवर अणुहल्ला करण्याची क्षमता उत्तर कोरियाने प्राप्त केली आहे, असे उत्तर कोरियाच्या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जॉंग उन यांनी या क्षेपणास्त्राच्या निर्मितीबद्दल समाधान व्यक्त केले असल्याचे सांगण्यात आले.
याला उत्तर म्हणून अमेरिका आणि दक्षिण कोरियाकडून आज क्षेपणास्त्रे सोडण्यात आली. उत्तर कोरियाला कठोर संदेश देण्यासाठी हा युद्धसराव करण्यात आल्याचे दोन्ही देशांकडून सांगण्यात आले.

Web Title: kim jon un marathi news international news global news