
उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांच्या बहिणीनं थेट अमेरिकेला धमकी दिलीय. दक्षिण कोरियात अमेरिकन विमान वाहू जहाज आणि लष्कराच्या हालचालींमुळे किम जोंग उनची बहिण किम यो जोंग भडकलीय. किम यो जोंगने अमेरिकेला प्रत्युत्तर देण्याची धमकी दिलीय. अमेरिका आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं पाऊल हे संघर्ष निर्माण करणारं आणि उन्मादी असल्याचंही तिने म्हटलंय.