
Kim Jong Un DNA Protection: Guards Secure Glass and Chair After Talks
Esakal
नॉर्थ कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांनी बुधवारी चीनची राजधानी बिजिंगमध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली. या भेटीनंतर किम जोंग यांच्या गार्ड्सनी त्यांनी पाणी प्यायलेला ग्लास सोबत नेला. तसंच ते ज्या खुर्ची टेबलवर बसले होते ती खुर्ची आणि टेबलही काळजीपूर्वक स्वच्छ करण्यात आले. याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये सुरक्षा रक्षक पाण्याचा ग्लास उचलत असल्याचं आणि टेबल-खुर्ची स्वच्छ करत असल्याचं दिसतंय.