6 देशांनी टीका केल्याच्या दुसऱ्याच दिवशी उत्तर कोरियाची क्षेपणास्त्र चाचणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

6 देशांनी टीका केल्याच्या दुसऱ्याच दिवशी उत्तर कोरियाची क्षेपणास्त्र चाचणी

गेल्या आठवड्यात केलेल्या क्षेपणास्त्र चाचणीवरून अमेरिका, जपान, फ्रान्ससह ६ देशांनी सोमवारी एकत्रित निवेदन जारी केलं होतं.

6 देशांनी टीका केल्याच्या दुसऱ्याच दिवशी उत्तर कोरियाची क्षेपणास्त्र चाचणी

उत्तर कोरियाने (North Korea) एक आठवड्याच्या आतच दुसऱ्यांदा बॅलेस्टिक मिसाइलची चाचणी केली आहे. यामुळे जपान (Japan) आणि दक्षिण कोरियाच्या (South Korea) चिंतेत वाढ झाली आहे. दक्षिण कोरियाच्या लष्कराने आणि जपानच्या तटरक्षक दलाने सांगितलं की, उत्तर कोरियाने पुन्हा एकदा क्षेपणास्त्र चाचणी केली आहे. किम जोंग उन यांनी त्यांच्या लष्कराला आणखी लष्करी प्रगती करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आठवड्याच्या आतच दुसऱ्यांदा क्षेपणास्त्र चाचणी करण्यात आली आहे. दुसऱ्या बाजुला दक्षिण कोरियाच्या लष्करानेसुद्धा शस्त्रसज्ज होण्यासाठी तयारी केली आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर असलेलं अस्थैर्य, त्यातच दक्षिण कोरिया आणि अमेरिकेसोबतच्या चर्चेला मिळालेली स्थगिती याच्या पार्श्वभूमीवर किम जोंग उन यांनी नव्या वर्षाच्या संकल्पात लष्कर मजबूत करण्याचे संकेत दिले होते. संयुक्त राष्ट्रात अमेरिका, फ्रान्स, आयर्लंड, जपान, ब्रिटन आणि अल्बानियाने सोमवारी एकत्रित निवेदन जारी केलं. त्यात उत्तर कोरियाने गेल्या आठवड्यात केलेल्या क्षेपणास्त्र चाचणीवरून टीका करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी उत्तर कोरियाने दुसऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी केली.

हेही वाचा: भारतात मुस्लिमांना भाजपकडून टार्गेट केलं जातंय - इम्रान खान

गेल्या आठवड्यात बुधवारी उत्तर कोरियाने म्हटलं होतं की, त्यांनी एका हायपरसोनिक मिसाइलची चाचणी केली. या चाचणीत मिसाइल लक्ष्यभेद करण्यात यशस्वी ठरल्याचा दावाही करण्यात आला होता. अण्वस्त्र सज्ज असलेल्या उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्रांच्या वाढत्या चाचण्यांमुळे दक्षिण कोरिया आणि अमेरिका यांच्यासोबतची चर्चा पुढे सरकली नाहीय. याच आंतरराष्ट्रीय अस्थिरतेचा सामना करण्याच्यादृष्टीने लष्कराला सज्ज राहण्याचे आदेश किम जोंग यांनी दिले होते.

Web Title: Kim Jong Un North Korea Tested Second Ballistic Missile In Week

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Kim Jong Un
go to top