भारतात मुस्लिमांना भाजपकडून टार्गेट केलं जातंय; इम्रान खान यांचा आरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IMRAN KHAN
भारतात मुस्लिमांना भाजपकडून टार्गेट केलं जातंय; इम्रान खान यांचा आरोप

भारतात मुस्लिमांना भाजपकडून टार्गेट केलं जातंय - इम्रान खान

नवी दिल्ली : भारतातील मुस्लिमांना भाजपकडून (BJP) टार्गेट केलं जात असल्याचा आरोप पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी केला आहे. अशा पद्धतीचा अजेंडा राबवणं हा प्रादेशिक शांततेसाठी धोका असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. डिसेंबरमध्ये उत्तराखंडमधील हरिद्वार येथे झालेल्या एका कार्यक्रमात मुस्लिमांविरुद्ध कथित प्रक्षोभक आणि प्रक्षोभक भाषणं झाली होती, या पार्श्वभूमीवर खान यांनी ट्विटरवरुन आरोप केले आहेत. (Indian Muslims are targeted by BJP Pakistan PM Imran Khan allegations)

हेही वाचा: तिसऱ्या लाटेला सुरुवात झालीए; पिकपॉईंट कधी असेल? राजेश टोपेंनी दिलं उत्तर

भाजप सरकार भारतातील अल्पसंख्याकांच्या विशेषत: 200 दशलक्ष मुस्लिम समुदायाच्या नरसंहाराच्या आवाहनाला समर्थन देते का? असा सवालही खान यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन विचारला आहे. याची आंतरराष्ट्रीय समुदायाने दखल घेण्याची आणि कारवाई करण्याची हीच योग्य वेळ आहे, असंही ते पुढे म्हणाले.

हेही वाचा: होय, चंद्रावर आहे पाणी! शास्त्रज्ञांना मिळाला पहिला थेट पुरावा

दुसर्‍या ट्विटमध्ये, खान यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारवर भारतातील अल्पसंख्याकांना लक्ष्य करण्याचा आरोप केला आणि याला अतिरेकी अजेंडा असं संबोधलं आहे. प्रादेशिक शांततेसाठी हे धोकायदायक असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. गेल्या महिन्यात, पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने भारताच्या प्रभारींना समन्स बजावलं होतं आणि हरिद्वार कॉन्क्लेव्हमध्ये केलेल्या कथित द्वेषयुक्त भाषणांबद्दल चिंता व्यक्त केली होती.

हेही वाचा: 'तो कधीच नियम पाळत नाही', सलमानच्या दिग्दर्शकानं वाचला पाढा

हरिद्वार येथे १७ ते २० डिसेंबरदरम्यान जुन्या आखाड्याचे यती नरसिंहानंद गिरी यांनी धर्म संसदेचं आयोजन केलं होतं. गिरी यांची आधीच द्वेषयुक्त भाषणं आणि मुस्लिमांविरुद्ध हिंसाचार भडकावल्याबद्दल पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. धर्म संसदेतही अनेक वक्त्यांनी प्रक्षोभक भाषणं केली होती तसेच अल्पसंख्याक समुदायातील लोकांना मारण्याचं आवाहन केलं होतं. या प्रकरणी १५ लोकांविरुद्ध दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top