उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची नुकताच बीजिंगमधील बैठक पार पडली आहे. या बैठकीनंतर किंम जोंग यांनी स्पर्श केलेली प्रत्येक वस्तू साफ करण्यात आली आहे. त्याचा एक व्हिडीओही आता सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ही साफ सफाई का करण्यात आली, याबाबत अधिकृत माहिती पुढे आलेली नाही. मात्र, त्यानंतर आता अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.