किमचं १२ हजार डॉलरचं स्विस वॉच आणि वेट लॉसच कनेक्शन

उत्तर कोरियाच्या हुकूमशहाची तब्येत कशी आहे?
Kim Jong Un’s secret visit to China
Kim Jong Un’s secret visit to China

हाँग काँग: उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन (Kim Jong Un) बद्दल आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये नेहमीच चर्चा सुरु असते. मागच्यावर्षी किम जोंग उन बरेच दिवस सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसला नाही, तेव्हा त्याच्या प्रकृतीबद्दल उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या होत्या. अजूनही या चर्चा कायम आहेत. मागच्याच आठवड्यात बऱ्याच दिवसांनी किम समोर आला, त्यावेळी तो सडपातळ दिसला. (weight loss) त्याचे वजन घटले होते. किमच्या मनगटावर १२ हजार डॉलर किंमतीचे एक महागडे स्विस घड्याळ (swiss watch) बांधलेले होते, त्या घडयाळाच्या फिटिंगवरुन त्याचे वजन घटल्याचा निष्कर्ष एनके न्यूजने काढला आहे. (Kim Jong Un’s $12,000 IWC watch says about his weight loss)

परदेशातील गुप्तहेर संघटना किमच्या राजवटीत कारभार कसा चालला आहे, त्याबरोबरच त्याच्या वजनावर सुद्धा लक्ष ठेवून असतात. त्याच्या कुटुंबाला ह्दयविकाराच्या आजाराचा इतिहास आहे. किमची राजवटीत स्थिरता आहे की, नाही याचा निष्कर्ष काढण्यासाठी त्याच्या प्रकृतीतल्या प्रत्येक चढ-उतारावर अत्यंत बारकाईन लक्ष ठेवले जाते.

Kim Jong Un’s secret visit to China
दूध आणायला गेल्याने रफी बचावले पण संपूर्ण कुटुंब संपलं

किमचे अंदाजित वजन १४० किलो असून २०११ मध्ये सत्तेत आल्यानंतर त्याचे वजन ५० किलोने वाढले, असे दक्षिण कोरियन गुप्तहेर संघटनेने नोव्हेंबर महिन्यात खासदारांना सांगितले होते. "पुढची काही वर्ष उत्तर कोरियावर आपली सत्ता अबाधित राखण्यासाठी किम शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त आहे का? या बद्दल परदेशी गुप्तचर यंत्रणांना माहिती हवी असते" असे एनके न्यूजचे वरिष्ठ विश्लेषक कोलीन झ्वीरको यांनी सांगतिले. उत्तर कोरियाकडे अण्वस्त्र आहेत. उद्या किमची प्रकृती ढासळली, तर पुढे काय होणार? या बद्दल दुसऱ्या देशांना चिंता आहे.https://youtu.be/4kdupIpRgHU

Kim Jong Un’s secret visit to China
लसीचा दुसरा डोस चुकवणाऱ्या ५० ते ६० हजार जणांना BMC शोधणार

उत्तर कोरियाचे संस्थापक किम संग यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला मागच्यावर्षी किम जोग उन अनुपस्थित होता, त्यावरुन जागतिक पातळीवर त्याच्या प्रकृतीबद्दल उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या होत्या. सेऊल स्थित एनके वेबसाइटनुसार किम जोंग उनव ह्दयाशी संबंधित शस्त्रक्रिया सुद्धा झाली आहे. आपल्या दाव्याला बळकटी देण्यासाठी ही वेबसाइट किमच्या मनगटावरील एका खूणेचा दाखला देते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com