
Bird Population UK: ब्रिटनचे राजे किंग चार्ल्स हे शिकारीला गेल्यानंतर त्यांना शिकार करण्यासाठी पक्षी जास्त नव्हते यावरून राग अनावर झाला. शिकारीला पक्षी नसल्यानं त्याचा राग किंग चार्ल्स यांनी कर्मचाऱ्यांवर काढला. त्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं. द सनने दिलेल्या रिपोर्टनुसार राजघराण्याच्या नॉरफॉक इस्टेटमध्ये शिकारीसाठी पक्ष्यांची संख्या कमी होत आहे. यामुळे ब्रिटनचे राजे किंग चार्ल्स हे नाराज झाले आहेत. नाराज झालेल्या चार्ल्स यांनी सँड्रिघममध्ये बऱ्याच काळापासून काम करणाऱ्या गेमकिपरला नोकरीवरून काढून टाकलं.